अभ्यासयांच्या काळात स्मार्टफोन ला थारा देऊ नका /जायभाये उपविभागीय पोलीस ठाण्यात. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 1 सितंबर 2018

अभ्यासयांच्या काळात स्मार्टफोन ला थारा देऊ नका /जायभाये उपविभागीय पोलीस ठाण्यात.



भोकरदन शहरात सरस्वती अभ्यासिका उदघाटन संपन्न.

शे.सलिम.
भोकरदन प्रतिनिधी 01/09/2018
भोकरदन शहरात दि 1 सप्टेंबर ला नव्याने सुरू झालेल्या सरस्वती अभ्यासिका चे शुभारंभ संपन्न झाले या वेळी भोकरदन तालुका पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील जायभाये यांनी उदघाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की येत्या काळात अनेक विभागात तरुण पिढीला अधिकारीच्या रूपात बघायचे असेलतर अभ्यासाच्या काळात कुठल्याही प्रकारचे मोबाइल व ईतर गोष्टींना हाताळणे तुम्ही केलेल्या परिश्रमाचे पाणी होईल जर तुम्हाला संधी चे सोने करण्याची संधी या अभ्यासिकांच्या माध्यमातून मिळते तर नक्कीच संधी चे सोने करून दाखवा असे त्यांनी बोलतांना सांगितले या वेळी भोकरदन पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी उपनिरीक्षक वैशाली पवार व उद्योजक हुकूमशेट चुंडावत सह पोलीस कर्मचारी मार्गदर्शक संभाजी खाडे व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती या वेळी सरस्वती अभ्यासिकेचे संस्थापक पो.उप.नी ज्ञानेश्वर साखळे यांनी सांगितले की मेहनती व शिक्षणासाठी वेळ देणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनी साठी गेल्या अनेक वर्षांपासून मी भोकरदन पोलिसात कार्यरत असतांना  बघत होतो की योग्यता असलेली अभ्यासिका या ठिकाणी नसल्याने ही गोष्ट आपण विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी ही मेहनत आपण केली पाहिजे मी सुद्धा शिखर चढण्यासाठी मोठे चटके घेतले होते तेव्हा माझ्या परिश्रमाला यश मिळाले आहे या प्रसंगी सर्वाना असे आव्हान करतो की आपल्या पाल्याचे प्रवेश आजच निश्चित करा या साठी  मासिक  मापक दर आकारण्यात येणार आहे व आमचे सुध्दा मार्गदर्शन असणार असल्याचे सांगितले होते या वेळी उपस्थित विद्यार्थी ज्ञानेश्वर जाधव संदीप गिरी भगवान सहाणे गोरख नामदे  सोबत अनेक विद्यार्थ्यांनी दि 1 सप्टेंबर ला प्रवेश घेतला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें