सोनपेठ(राजेश खेडकर) दि.१०सप्टेंबर २०१८.
वाढती महागाई, दरदिवसाने सातत्याने वाढत असलेले पेट्रोल, डिझेल व गॅस चे दर यावर अंकुश ठेवण्यात केंद्र व राज्य सरकार अयशस्वी ठरले, यामुळे आज दि.१०सप्टेंबर रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने भारत बंदचे आवाहन केले होते होते. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही या बंदला पाठिंबा होता. त्या अनुषंगाने स्थानीक दोन्ही पक्ष कार्यकर्त्यांही शहरातील व्यापारी व नागरीकांना बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. मात्र आजच्या या बंदमुळेे अगदी कांही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गौरी गणपती उत्सावाच्या आनंदावर विरजण पडते की काय असे वाटत असतानाच, दुपार पर्यंत दुकाने बंंद ठेेवून बारा नंंतर शहरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले. येत्या १३ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी व १५सप्टेंबर रोजी गौरी आवाहन हे सण आहेत. या दोनही सणापुर्वीचा आजचा सोमवार शेवटचा आहे. सोनपेठ येथे दर सोमवारी संपुर्ण तालुक्यातील जनतेसाठी जिवनावश्यक साहित्य, आठवड्यासाठी लागणारा भाजीपाला, अन्नधान्य व इतर आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी महत्वाचा दिवस आहे. आजच्या पुकारलेल्या भारत बंद मुळे वरील सणांवर विरजण पडणार की काय? असे वाटत होते. मात्र तसे झालेे नाही. सोनपेठ येथील बाजारपेठेतील दुकाने दुुपारच्या बारा वाजता उडली होती. तत्पुर्वी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस व मनसेच्या कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढ त्वरीत थांबवावी अशा मागणीचे निवेदन नायब तहसीलदार एन.टी.वाळे यांना सुपुर्द केले.
थोडक्यात आजच्या भारत बंदला सोनपेठ येथुन संमिश्र प्रतिसाद मिळाला असेच म्हणावे लागेल.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें