पालम तालुक्यात निवडणूक कामाचा उडाला बोजवारा,डोर टु डोर बिएलओ फिरत नसल्यामुळे मतदार बिएलओचा शोधतात. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 30 सितंबर 2018

पालम तालुक्यात निवडणूक कामाचा उडाला बोजवारा,डोर टु डोर बिएलओ फिरत नसल्यामुळे मतदार बिएलओचा शोधतात.




पालम/अनीस खुरेशी

निवडणुक आयोगाने संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर केले आहे.प्रारूप मतदारांची नावे या यादीत समाविष्ट  नाहीत अशा मतदारांनी नावे समाविष्ट करण्यासाठी,ज्या मतदारांना आक्षेप घ्यावयाचे असतील अशा मतदारांना विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर  करण्यासाठी पालम तहसील कार्यालयामार्फत पालम तालुक्यातील शंभर प्रभागात  शंभर बिएलओ यांना नेमणूक केली असुन सुद्धा पालम शहरात आज पर्यंत एकाही बि.एल.ओ यांनी नेमण्यात आलेल्या प्रभागातील ठिकाणी  डोर टु डोर जाऊन निवडणुक आयोगाच्या कामाची प्रभावी अंमलबजावणी केलेली नसल्यामुळे शहरातील नागरिकांना बिएलओ यांच्या शोध घेण्याची वेळ आली आहे
पालम तहसीलदार तेजस्वी जाधव यांनी पालम तालुक्यातील शंभर प्रभागात शंभर बिएलओ यांना डोर टु डोर पाठवून निवडणुक आयोगाच्या कामाची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें