शहीद भगतसिंग यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीर संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 30 सितंबर 2018

शहीद भगतसिंग यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीर संपन्न.



सोनपेठ (राजेश खेडकर)दि.२९सप्टेंबर २०१८
शहीद भगतसिंग यांच्या जयंती निमित्त येथील कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात या शिबीरात महाविद्यालयाचे कर्मचारी, मान्यवर, विद्यार्थ्यांसह एकुण चाळीस जनांनी रक्तदान केले. या प्रसंगी उद्घाटक म्हणून हशिप्रमंचे अध्यक्ष परमेश्वर कदम हे होतेे, तर रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, सचिव इंजि. चंद्रकांत लोमटे. सदस्य रो.जयसिंगराजेे देशमुख, प्राचार्य आर.टी.बेदरे, प्राचार्य वसंत सातपुते आणि पत्रकार किरण स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबीरात संकलीत झालेले रक्त स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीस देण्यात आले. डॉ.शिवराज थोरात व त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्त संकलन केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.बापुराव आंधळे, प्रास्ताविक प्रा.डॉ.मुक्ता सोमवंशी तर आभार प्रा.डॉ.मारोती कच्छवे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लबचे सर्व सदस्य, महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
या शिबीरात महाविद्यालयाचे कर्मचारी, मान्यवर, विद्यार्थी व नागरिकांनी रक्तदान केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें