सेलू (समशेर पठाण )
घाटकोपर येथील दहीहंडी कार्यक्रमात बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपाचे आमदार राम कदम यांनी हिंमत असेल तर कोणत्याही मुलीला हात लावून बघावं राम कदम यांचे हात कापून टाकू अशा प्रकारच्या संतप्त प्रक्रियेचे निषेध चे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते यांनी जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांना दिले.
आ. राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेस या जिल्हाध्यक्षा भावना नखाते यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी पी शिव शंकर यांची ७ सप्टेंबर रोजी भेट घेतली आणि त्यांना सदरील निवेदन राज्यपाल यांना कळविण्यात यावे अशी विनंती केली यामध्ये महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे शिवछत्रपतींच्या विचारांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रामध्ये सत्तेतील भाजपा आमदारांचे बेताल वक्तव्य लज्जास्पद आहे .शासन महिलांसाठी सुरक्षा व आत्मसंरक्षणासाठी वेगवेगळे निर्णय घेत असताना भाजपाचे एक आमदार राम कदम हे मुलींना पळविण्याची भाषा करतात अशा भाजपा आमदार कारवाई होणे आवश्यक आहे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी. भाजपाची संस्कृतीही बेटी पढाव बेटी बचाव असे असताना या संस्कृतीला गालबोट लावून भाजपचे आमदार राम कदम हे बेटी भगाव च्या मार्गावर मार्गक्रमण करीत आहेत
यापूर्वी भाजपाचे भाजपाचे आमदार प्रशांत पारिचारक यांनी सीमेवर राहणाऱ्या सैनिकांच्या पत्नी बद्दल काढलेल्या वक्तव्यांच्या वेदना आजही मनाला बेचेन करीत असताना भाजपाचा दुसरा आमदार राम कदम हा मुली पळविण्याची भाषा करतो त्यामुळे भाजपाच्या आमदारांना सत्तेचा माज आलाय खरेतर विधानसभा सभाग्रहात कायदे केले जातात आणि या सभागृहातील आमदार असे बेताल वक्तव्य करत असतील तर अशा आमदारांना विधानसभेत पाय ठेवण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी याबाबत गंभीर दखल घ्यावी अशा भावना रा.काँ महिला जिल्हाध्यक्षा भावना नखाते त्यांनी जिल्हाधिकारी पि शिव शंकर यांच्यासमोर व्यक्त करीत ह्या भावना राज्यपाल यांना कळवाव्यात अशी विनंती यावेळी विनंती केली या शिष्टमंडळात मिरा सरोदे ,अर्चना भिसे ,मिरा वाघ ,गंगासागर मोरे ,शितल ठोंबरे यांचा सामावेश होता.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें