महागाईच्या विरोधात काँग्रेसचा "१० ला भोकरदन बंदची" हाक. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 7 सितंबर 2018

महागाईच्या विरोधात काँग्रेसचा "१० ला भोकरदन बंदची" हाक.



भोकरदन प्रतिनिधी : पेट्रोल आणि डिझेलच्या वढत्या दरांमुळे  दरवाढीच्या विरोधात काँग्रेस पक्षाने १० सप्टेंबरला भारत बंदची घोषणा केली आहे, त्याअनुषंगाने भोकरदन काँग्रेस कमिटीच्या वतीने भोकरदन बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.शांततेत व लोकशाही मार्गाने सकाळी १० ते ३ वाजेपर्यंत हा बंद राहणार असल्याचे लेखी निवेदन दि.७ रोजी उपविभागीय अधिकारी साहेब भोकरदन व पोलीस निरीक्षक भोकरदन यांना देण्यात आले.या वाढत्या दरांमुळे सामान्यांना चांगलाच फटका बसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दरांमध्ये लागोपाठ थोडी-थोडी वाढ होत आहे. या महागाईमुळे जनता त्रस्त आहे,पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे लोकांमध्ये आक्रोश वाढत आहे, यामुळे १० तारखेला भोकरदन  बंदची घोषणा करण्यात आली आहे.हा बंद १००% यशस्वी करण्याचे आवाहन काँग्रेसचे जिल्हाकार्याध्यक्ष राजाभाऊ देशमुख , काँग्रेस तालुका अध्यक्ष त्रिंबक अप्पा पाबळे व काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें