सोनपेठ(राजेश खेडकर) दि.०८सप्टेंबर २०१८.
अज्ञानामुळे समाजातील सामान्य घटकांचे मोठे नुकसान झाले असून, अज्ञानाला दुर करण्यासाठी विज्ञान आवश्यक आहे व वैज्ञानिक दृष्टिकोण रूजवण्याचे काम सुशिक्षीतांचे आहे. असे मत प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांनी व्यक्त केले. ते कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभाग आणि महाराष्ट्र विवेक वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्रद्धा अंधश्रद्धा आणि विज्ञान हा वैज्ञानिक दृष्टीकोन या कार्यक्रमात अध्यक्षीय समारोप करताना बोलत होते.
शहरातील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतेे. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, तर प्रमुख मार्गदर्शक पंचायत समितीचे प्र. स.अंकुश रसाळ, प्रा. विठ्ठल मुलगीर होते.
यावेळी 'गरज अंधश्रद्धा निर्मूलनाची' या भित्तीपत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाच्या राधा कांदे, रंजना भाकरे, कन्याकुमारी भोसले, अविनाश आगळे, सचिन बोडके या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. अंकुश रसाळ यांनी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यावर आधारित प्रयोग सादर केले व त्यानंतर प्रयोगामागील वैज्ञानिक दृष्टीकोन विद्यार्थ्यांना समजावून सांगितला तर प्रा.विठ्ठल मुलगीर यांनी कोणत्याही गोष्टींचा स्विकार करताना आपण चिकित्सक वृत्ती ठेवली तर अंधश्रद्धा बळावणार नाही, अंधश्रद्धेचे स्वरूप खूप व्यापक आहे, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जनजागृतीची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी समाजशास्त्र विभागास महाराष्ट्र विवेक वाहिनी कडून विद्यार्थी, विवेक आणि विज्ञान आणि सावित्रीबाई फूले जीवन कार्य ही पुस्तके भेट देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंदु वाणी तर प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा.डॉ. सुनिता टेंगसे यांनी केले. स्वागत गीत कु. राधा कांदे, रंजना भाकरे यांनी म्हटले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिन बोडके यांनी केले व कार्यक्रमाची सांगता राष्ट्र गीताने करण्यात आली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें