तांदळवाडी च्या शेतकऱ्यांचे पीक कर्जासाठी आंध्रा बँकेसमोर उपोषण. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 26 सितंबर 2018

तांदळवाडी च्या शेतकऱ्यांचे पीक कर्जासाठी आंध्रा बँकेसमोर उपोषण.

 आरबीआयच्या धोरणावर आडले बँक व्यवस्थापक. धरणे आंदोलना नंतर आता आमरण उपोषण.


 सेलू! प्रतिनिधी

 तालुक्यातील तांदूळवाडी येथील शेतकऱ्यांनी पिक कर्ज देण्यात यावे या मागणीसाठी अगोदर धरणे आंदोलन व त्यानंतर आमरण उपोषण २४ सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. तांदळवाडी येथील १०० शेतकऱ्यांनी ३ ते २१  दरम्यान सुट्टीचे दिवस वगळता बँकेसमोर पीक कर्जासाठी धरणे आंदोलन केले. याचा  पिक कर्ज मिळण्यासाठी काहीच उपयोग झाला नसल्यामुळे२४  सप्टेंबर पासून शेतकरी संघटनेचे दत्तराव रघुनाथराव राऊत या शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. बँकेच्या समोर उपोषणाचा मंगळवारी दुसरा दिवस होता. तांदळवाडी येथील सुमारे१५० शेतकऱ्यांनी पीक कर्जाची मागणी केली होती. यापैकी थकबाकीदार शेतकरी वगळता आंध्र बँकेच्या वतीने४० शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित शेतकरी थकबाकीदार असल्यामुळे त्यांना पिक कर्ज देऊ शकत नाही असे  आंध्रा बँकेचे सेलू शाखेचे व्यवस्थापक आच्युत  श्रीराव यांनी स्पष्ट केले. पिक कर्ज  वाटप बँक आरबीआय धोरणाप्रमाणे करत आहे. असे बँकेचे व्यवस्थापक श्रीराव  यांचे म्हणणे आहे. तर शेतकरी दत्तराव राऊत याचे  महाराष्ट्र शासन धोरणाप्रमाणे बँकेने कर्ज द्यावे असे म्हणणे आहे. शेतकऱ्याकडे जिंतूर येथील सुंदरलाल सावजी बँकेचे थकित कर्ज आहे. अशावेळी बँक पीक कर्ज देण्यास सहमत नाही. म्हणून तांदळवाडी येथील शेतकऱ्यांनी ३
 ते२१ सप्टेंबर दरम्यान बँकेसमोर धरणे आंदोलन केले. धरणे आंदोलनाला फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शेतकरी  दत्तराव राऊत  यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आंध्र बँकेचे व्यवस्थापक श्रीराव आरबीआयच्या पिक कर्ज वाटप धोरणावर अडून बसले आहेत. तर शेतकरी दत्तराव राऊत महाराष्ट्र शासनाच्या धोरणाप्रमाणे पिक कर्ज नसेल तर आणि सातबारा थकीत असेल तरी  शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवू नये यावर ठाम आहे. धरणे आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या आंध्रा बँकेच्या वरिष्ठांनी  आमरण उपोषण नंतर तरी लक्ष द्यावे अशी मागणी उपोषण करते दत्तराव राऊत यांचे म्हणने आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें