वंचित बहुजन आघाडीच्या शेतकरी महाअधिवेशनास उपस्थित रहा -दिपक डोके . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 26 सितंबर 2018

वंचित बहुजन आघाडीच्या शेतकरी महाअधिवेशनास उपस्थित रहा -दिपक डोके .



शेख सलिम

भोकरदन  (प्रतिनिधी ) आगामी  2 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद येथे वंचित बहुजन  आघाडीच्या वतीने शेतकरी महाअधिवेशना चे आयोजन करण्यात आले असून या अधिवेशनात भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष माजी खासदार प्रकाश तथा बाळासाहेब  आंबेडकर व  एम  आय  एम चे अध्यक्ष खासदार असोदधधीन  ओवेसी हे मार्गदर्शन करणार आहेत तरी या अधिवेशनास भोकरदन तालुक्यातील दलित, मुस्लिम सह वंचित समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे  असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिपक डोके यांनी केले आहे.
रविवार दि .23  रोजी अधिवेशन तयारी निमित्त भोकरदन येथील शासकीय विश्रामगृहात भारिप बहुजन महासंघ, एम.आय. एम. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मार्गदर्शन करताना दिपक डोके यांनी आवाहन केले.
सदरील बैठकीच्या अध्यक्ष स्थानी  भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष प्रदीप जोगदंडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अॅड. कैलास रत्नपारखे, विष्णू खरात, विनोद दांडगे, शेख लाला भाई,ज्ञानेश्वर जाधव, गौतम वाघमारे आदी उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी भारिप बहुजन महासंघात प्रवेश केला. त्यात काँग्रेस चे मंगेश पगारे यांच्यासह अनेकांनी प्रवेश केला.
यावेळी विशाल मिसाळ, रमण पगारे सुभाष सुरडकर,  एम  आय  एम चे तालुकाध्यक्ष आसिफ कुरेशी(गज्जू अण्णा),शहराध्यक्ष इसरार पठाण, राजू राऊत, प्रकाश सुरडकर, दिपक वेलदोडे, मंगेश पगारे, समाधान वाघ, योगेश पारखे, दिपकिरण पगारे, बुदधभूषण जगताप, यांच्या सह शहरासह तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें