गरजवंतांना मदत करणे हा खरा माणूस धर्म आहे.- राम मैफळ ,मुख्याध्यापक,पारडी.खाऊच्या पैशातून गरजू विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 26 सितंबर 2018

गरजवंतांना मदत करणे हा खरा माणूस धर्म आहे.- राम मैफळ ,मुख्याध्यापक,पारडी.खाऊच्या पैशातून गरजू विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप.



सेलू प्रतिनिधी:
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्डी येथे सत्कार्याची दान या कार्यक्रमात गरजू विद्यार्थ्यांना दप्तरांचे  वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक राम मैफळ तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचेअध्यक्ष अमोल अडे, न्यू मॉडेल स्कूल सेलू चे  जोशी सर व बोराडे सर हजर होते.याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करत असताना युवराज माने यांनी सदरील कार्यक्रमाचे व न्यू मॉडर्न स्कूल येथील विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. आपण चालवलेला हा स्तकार्याचा वसा असाच पुढे आम्ही चालू असे ते म्हणाले.न्यू मॉडर्न स्कूलची विद्यार्थिनी प्रियंका बोराडे हीने, सत्कार्याचे दान ती सुचलेली कल्पना  सविस्तर विशद केली. आमचे मार्गदर्शक शिक्षक जोशी सर व बोराडे सर यांनी इतरांना मदत कशी करावी ,आपण समाजाचे उतराई कसे व्हावे या संदर्भात मार्गदर्शन केले व त्या माध्यमातून आम्ही दर बुधवारला प्रत्येक विद्यार्थी पाच रुपये जमा करू लागलो. वर्षभरात जमा झालेली सर्व राशी व त्यात आमच्या सर्व गुरुजनांनी काही पैसे लावून गरजवंत विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचे दप्तर वाटप करावे अशी संकल्पना सुचली. त्यानुसार आम्ही शाळेचा शोध घेतला. मध्ये अति दुर्गम भागांमध्ये आपली असलेली ही पारडी शाळा निवडली व आज या दप्तरांचे वाटप करत आहोत .येथील विद्यार्थ्यांशी भेटून व या विद्यार्थ्यांचे उपक्रम पाहून खऱ्या अर्थानं योग्य ठिकाणी आम्ही हे दान दिल आहे असं वाटत आहे .त्याचप्रमाणे या प्रसंगी न्यू मॉडर्न स्कूलचे शिक्षक सन्माननीय जोशी सर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे वेगवेगळे उपक्रम पाहून व विद्यार्थ्यांचे वक्तृत्व ऐकून मी व माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थी खूप प्रभावित झालो आहोत ,आज खऱ्या अर्थाने आम्ही आपल्या शाळेची केलेली निवड ही  सार्थकी लागली असंही वाटू लागला आहे असे ते म्हणाले.त्याचप्रमाणे बोराडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना शाळेचा परिसर, शाळेचे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेले वेगवेगळे उपक्रम पाहून मी भारावून गेलो. खरेच आपण सर्व शिक्षक अतिशय प्रामाणिकपणे इतक्या आत मध्ये काम करत आहात याचाही आम्हाला अभिमान वाटत आहे. यावर्षी जरी आम्ही काही विद्यार्थ्यांची निवड केली असली तरीसुद्धा आपण  पुढील वर्षी आम्ही सर्व विद्यार्थ्यांना दप्तर व एकेक डिक्शनरी वाटप  करू असही त्यांनी याठिकाणी शब्द दिला.
याप्रसंगी शाळेची विद्यार्थिनी काजल राठोड हिने सत्कार याचे दान या विषयावर व न्यू मॉडर्न स्कूलचे अतिशय अस्खलितपणे आभार व्यक्त केले ती बोलत असताना आपण लावलेलं  सत्कार्याचा रोपटं तर नक्कीच आम्हीसुद्धा पुढे वाढवू चालू असा शब्दही त्यांना याप्रसंगी दिला. काजल राठोड या विद्यार्थिनीचा बोलणे ऐकून जोशी सरांनी तिला एकशे एक रुपयाचे पारितोषिक सुद्धा दिलं.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात मैफल सर म्हणाले, गरज वनताना मदत करणे हा खरा मानव धर्म आहे आणि तो मानव धर्म आज आपण आमच्या शाळेत येऊन गरजवन्त विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करून दर्शविला आहे. त्याबद्दल शाळेच्या वतीने व विद्यार्थ्यांच्या वतीने मी आपले शतशः आभारी आहे असं ते म्हणाले. खऱ्या अर्थाने आज आपण आमच्या शाळेत एक नव्या उपक्रमाचे बीज पेरलात  हे रोपटं नक्कीच भविष्यात वटवृक्षात रुपांतर होईल असा आम्हाला विश्वास आहे.
त्याचप्रमाणे याप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी कार्यक्रमा प्रति आत आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज माने तर आभार प्रदर्शन संजय काकडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रुपणर सर, विठ्ठल शेळके, सुभाष लंगे यांनी सहकार्य केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें