पंतप्रधान जनआरोग्य योजना म्हणजे आयुष्यमान भारत योजनेचे महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल के. विद्यासागर राव यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. राज्यातील 83 लाख 72 हजार नागरिकांना या योजनेचा लाभ होणार आहे. देशातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवेचा लाभ घेता यावा, यासाठी आयुष्यमान भारत ही महत्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यातील 83 लाख 72 हजार कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आज महाराष्ट्राचे राज्यपाल के. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच दिल्लीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या योजनेचा शुभारंभ केला. यावेळी निवडक लाभार्थ्यांना ई-कार्डचे वाटपही करण्यात आले. सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेतील 2011 च्या आकडेवाडीनुसार राज्यातील 83 लाख 72 हजार कुटुंबाची निवड या योजनेसाठी करण्यात आली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें