सेलू प्रतिनिधी
सेलू तालुक्यातील निपाणी टाकळी येथील विद्यार्थ्यांनी दररोज शिक्षण घेण्यासाठी सेलू ला जाताना बसमध्ये जागा तर कधीकधी गर्दीमुळे बसच मिळत नसल्याने होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीमुळे सेलू परभणी रस्त्यावर निपाणी टाकळी येथील पाटीवर एम एच ०६ एच ८७८२ ही बसवून आडवुन रस्ता रोको आंदोलन शनिवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते साडेदहा दरम्यान केले सेलू चे तहसीलदार आसाराम छडीदार, पोलीस निरीक्षक संदिपान शेळके ,जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती अशोक काकडे व एसटी परिवहन विभागाचे संबंधित अधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनानंतर तासभराच्या आंदोलनानंतर रस्ता वाहतुकीस सुरळीत करण्यात आला याबाबत माहिती या प्रमाणे सेलू तालुक्यातील निपाणी टाकळी येथील शंभरावर विद्यार्थी व विद्यार्थिनी प्राथमिक शिक्षणापासून महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी सहा किमी अंतरावर असलेल्या सेलू या तालुक्याच्या ठिकाणी येतात येथील विद्यार्थिना परभणी आगाराच्या बस फेेेेर्यवर अवलंबून राहावे लागते. या ठिकाणाहून सेलू ला जाण्यासाठी पहाटे साडेआठ ,साडेनऊ, साडेदहा, वाजता बसेस आहेत साडेआठ वाजता च्या बसने गेले तर वेळ वाया जातो तर साडेदहाच्या बसने गेल्यावर शाळेत वेळेवर पोहोचता येत नाही .म्हणून सर्वच विद्यार्थिनी हे साडेनऊ वाजता जाणाऱ्या बसने प्रवास करतात शैक्षणिक सत्राच्या पहिल्या चार महिन्यात विद्यार्थ्यांना बसण्यासाठी तर या बसमध्ये कधी जागा मिळत नाही पण उभे राहून देखील सर्व विद्यार्थ्यांना या बसने जात नाहीत परिणामी शैक्षणिक नुकसान होते या रोजच्या कटकटीला वैतागून सर्वच विद्यार्थिनीं या रोजच्या कटकटीला वैतागून सर्वच विद्यार्थ्यांनी शनिवारी 8 सप्टेंबर रोजी परभणी शेलु ही साडेनऊ वाजता जाणारी बस निपाणी टाकळी येथील पाटीवर बसमध्ये उभे राहण्यासाठी देखील जागा नसल्यामुळे रोखली आणि शंभरावर विद्यार्थिनी व विद्यार्थी रस्त्यावर तासभर बसून रस्ता रोको आंदोलन केले या आंदोलनाची माहिती कळताच सेलुचे तहसीलदार आसाराम छडीदार पोलीस निरीक्षक संदिपान शेळके जिपचे बांधकाम सभापती अशोक काकडे घटनास्थळी दाखल झाले परिवहन विभागाचे संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असता संतप्त विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन आंदोलक विद्यार्थ्यांना आश्वासन दिल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली विद्यार्थ्यांनी रोजच्या होणाऱ्या गैरसोयीमुळे तासभर रास्ता रोको आंदोलना नंतर आश्वासन दिल्यामुळे रस्ता सुरळीत करून देण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वतीने संबंधित परिवहन अधिकाऱ्यास निवेदन देखील देण्यात आले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें