शिर्डी प्रतिनिधी (राजेंद्र दुनबळे).
शिर्डी
साई बाबांच्या दर्शना साठी अनेक साई भक्त येतात तर काही आपल्या वयोवृद्ध आई वडिलांना येथेच सोडून जातात असे अनेक वेळा घडले आहे ,दोन दिवसांपूर्वी शिर्डी साईनगर रेल्वेस्टेशन येथे निराधार वयोवृद्ध आजी बेवारस आढळूननआली रेल्वेपोलिस मा.संदीप नवसारे,मा.गणेश गर्जे यांनी शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश दळवीयाना कळवले असता लगेच तातडीने साईनगर रेल्वे स्टेशनवर गेले असता वयोवृद्ध आजी अंदाजे वय 75, वर्ष ह्या आजी गेल्या 4ते5 दीवसापासून तेथे बेवारस असल्याचे समजले अंगावर ताप होता डोळ्याने दीसत नाही कोणीतरी आजीबाईंना सोडल्याचे दिसून आले वयोवृद्ध आजी जाणार कुठे हा मोठा प्रश्न निर्माण झाला परंतु साई बाबांच्या दरबारात न्याय असल्याने साईंच्याच साईआश्रयात गणेश दळवी यांनी त्या माउलीला घेउन गेले आजीला गरम पाण्याने स्वच्छ करुन चहा नाष्टा देऊन औषधे देण्यात आली आजीला हक्काचे घर मिळाले या माउलीचे येथून पूढचे जिवन सन्मानाने सुख शांतीने जगेल एवढीच साईचरनी प्रार्थना.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें