कु.किरण जाधव-
शिर्डी ,
२०१८ हे वर्ष सदगुरू श्री साईबाबांचे समाधी शताब्दी वर्ष आहे. बाबांनी १५ ऑक्टोबर १९१८ साली मानवी देहाचा त्याग केला. परंतु त्यापूर्वी ३७ दिवस आधी म्हणजेच ०९/०९/१९१८ रोजी श्री साईनाथ स्तवनमंजरी लिहून पूर्ण झाली. या स्त्रोत्राचे लेखन ह.भ.प. श्री दासगनू महाराज यांच्याकडून बाबांनी पूर्ण करवून घेतलें. या स्त्रोत्रातील प्रत्येक शब्द मंत्राप्रमाणे पवित्र आहे. जणूकाही बाबाच आपल्या बरोबर बोलत आहेत असा भास होतो. या स्त्रोत्राच्या पठणाने मतिमंद बुद्धिवान होतील, ज्यांना संतान प्राप्ती हवी असेल त्यांची मनोकामना पूर्ण होईल. दारिद्रयाचा नाश होईल, लोक शतायुषी होतात. सर्व दुःखांचा नाश होऊन चांगले आरोग्य प्राप्त होते. मनात तर्क वितर्क न करता दृढ़भाव ठेऊन नित्य पठण करावे. बाबांवर श्रद्धा ठेऊन एकदा तरी शिरडीस जाऊन अनुभव घ्यावा. अनाथांचे कैवारी भक्त कामकल्पद्रुम श्री साईनाथांच्या प्रेरणेने शके १८४० भाद्रपद शुद्ध पक्ष गणेश चतुर्थी सोमवार या मंगल दिनी, म्हणजे येणाऱ्या १३ सप्टेंबर २०१८ रोजी श्री साईनाथ स्तवनमंजरी ह्या स्त्रोत्रास १०० वर्ष पूर्ण होणार आहे.
तरी आपण समस्त साई भक्तांने ह्या मंगल दिनी श्री साईनाथ स्तवनमंजरीचे पठण करून बाबांच्या ह्या स्त्रोत्रास मानवंदना देऊन मोठ्या उस्तवात हे साई शताब्दी वर्षे साजरे करावे , ठीक ठिकाणी हे शताब्दी वर्षे मोठ्या धार्मिक कार्यक्रमाने साजरा होतांना दिसत आहे,गावा गावात सगळीकडे भक्ती मय वातावरण आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें