२०१९चा मुख्यमंत्री अॅड बाळासाहेब आंबेडकर ,,..खरात. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 2 सितंबर 2018

२०१९चा मुख्यमंत्री अॅड बाळासाहेब आंबेडकर ,,..खरात.



महाराष्ट्र राज्याला अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची गरज,


शिर्डी/ प्रतिनिधी( राजेंद्र दुनबळे)
 गांधी ,पवार,ठाकरे कुटुंबांना आज पर्यंत मतदान केले पण आता न्याय व हक्कासाठी महाराष्ट्र राज्याला भारीप बहुजन महासंघाच्या माध्यमातून अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्व व विचारांची गरज असल्याचे भारीप बहुजन महासंघाचे उत्तर जिल्हा अध्यक्ष शरद खरात यांनी म्हटले आहे शिर्डी व राहाता परीसरातील भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्तेची बैठक नुकतीच राहाता येथे पार पाडली या प्रसंगी बाजीराव रणशुर.अनिल बनसोडे.खलिद कुरेशी.रविंद्र साबळे.साईनाथ जाधव.सतिष गुजाळ.गणेश रणशुर.प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.पुढे खरात म्हणाले कि राज्यात जोपर्यंत बहुजन नांचे नेतृत्व करणारे  प्रकाशजी आंबेडकर मुख्यमंत्री होत नाही तो पर्यंत बहुजनसमाज न्याया पासून वंचित राहील पूर्वी  सुध्दा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला न्याय मिळवुन दिला आज हि अन्यायला वाचा फोडुन सर्व सामान्यांना बहुजनां न्याय मिळवून देण्यासाठी आंबेडकर कुटूंब झटत आहे.आंबेडकर कुटुबांचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत.
सक्षम नेता नसल्यामुळे समाज भरकटत गेल्यामुळे याचा आजही राजकीय पुढारी वापर करुन घेत आहे आता आपल्यासाठी काम करुन गाव तीथे शाखा हि संकल्पना राबवुन भारीप बहुजन महासंघाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शाखा वाढवृन कार्यकर्ताची मोठी फौज करुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी अॅड बाळासाहेब आंबेडकर यांना विराजमान करण्याचा ध्यास सर्व बहुजनानी घ्यावा असा संकल्प करुन जोमाने कामाला लागावे असे ते शेवटी म्हणाले.
या वेळी बोलतांना बाजीराव रणशुर म्हणाले की भीमा कोरेगाव दंगल संभाजी भिडे.मिलिंद एकबोटे या दोघान मुळे झाली या दोघांना वेळीच अटक केली असती तर महाराष्ट्र पेटला नसता या मुळे बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याच बरोबर नोट बंदी केल्याने आर्थिक परिस्थिती बिकट होउन पैशे काढण्यासाठी गेलेल्या लोकांचा मृत्यु झाला.महागाई वाढली.पेट्रोलचे भाव वाढले विद्यार्थींचा शिक्षवृर्ती बंद करण्याचा डाव केला.राज्य घटनेत बदल करण्याचा प्रयत्न केला जात आहे यासाठी तमाम बहुजनानी एकत्र येऊन भारीप बहुजन महासंघात प्रवेश करावा व अॅड बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करावे असे ते शेवटी म्हणाले.
आलेल्या सर्व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला
या वेळी विकास बोधक.उत्तम पाईक.बाबासाहेब आवारे.राजेंद्र भालेराव.विनय कदम.पुष्पक कदम.सौ.उज्वला निकम.सतिष निकम.रविंद्र गायकवाड.भारत पवार.सतिष कदम.सागर कदम.अमोल कदम.बाबासाहेब बनसोडे.राहुल वाघमारे.संदिप म्हस्के.आशिष कदम.प्रशांत कदम.गौतम पगारे.आदी सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्तीत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें