महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला आमसभा संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 3 सितंबर 2018

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला आमसभा संपन्न.


सोनपेठ (राजेश खेडकर) दि.०३सप्टेंबर २०१८
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान परभणी जिल्ह्यात इंन्सेनसिव पद्धतीने चालू असुन तालुक्यातील विटा (खु.) येथे दि. ०२सप्टेंबर रोजी अभियानांतर्गत महिलांची आमसभा घेन्यात आली. यावेळी सरपंच रुक्मिणबाई भोसले यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फूले यांच्या प्रतिमेचे पूजन करून आमसभेची सुरुवात करण्यात आली. वर्धिनीताई सारीका खोब्रागडे, अनुराधा चतूर आणि सोनाली बघेल यांनी उपस्थित महिलांना गाव प्रवेशापासुन आमसभेच्या दिवसापर्यंत असलेल्या टप्प्यांविषयी सखोल मार्गदर्शन केले.
सोनपेठ पंचायत समिती अंतर्गत वर्धिनी फेरी चालू झाल्यापासून आजपर्यंत एकूण ८५ स्वंयसहाय्यता समूहाची स्थापना करण्यात आली असुन गरीबातील गरीब महिला या अभियानात सहभागी होत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. वर्धिनी फेरी मार्फत अभियानाच्या नियमानुसार गरीब विधवा, परीत्यक्ता, निराधार, एकल महिलांचा समावेश या स्वयंसहाय्यता समूहात होतो.
यावेळी कस्तुरा भोसले, शामल उंडाळकर, ज्योति भोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तालुका अभियान व्यवस्थापक बाबासाहेब हिरवे यांनी उमेद अभियानाची सविस्तर माहिती दिली. प्रभाग समन्वयक अंकुश रसाळ यांनी दशसुत्री, विशाल चौरे यांनी अस्मिता योजना व प्रदीप हरणावळ यांनी यांनी DDU-GKY, रोजगार मेळावा याविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमास गावातील तरूणी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत आणि जि.प.प्रशाळा विटा (खु.) यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वर्धिनीताई सोनाली बघेल यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें