सेलू प्रतिनिधी
सेलू (समशेर पठाण )
सेलू तालूक्यातील नांदगाव येथील अंगणवाडीला स्वतंत्र ईमारत नसल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात बालकांना बसवावे लागत आहे.सेलू तालूक्यात १५५ पैकी २६ अंगणवाड्याना आजही स्वतंत्र ईमारत नसल्याने यांना ग्रामपंचायत किंवा शाळांच्या ईमारतीचा आधार घ्यावा लागत आहे.
लहान बालकांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून अंगणवाड्या सूरू करण्यात आल्या.या अंगणवाड्यामधून ग्रमीण भागातील बालके कुपोषणमुक्त होण्यास मदत होत आसल्याने एक प्रकारे कुपोषणमुक्तीचा उद्देश सफल झाला तसेच या बालकांचे आरोग्य सदृढ रहावे यासाठी त्यांना पोषण आहार दिला जातो. मात्र भौतीक सुविधांतर्गत ईमारतच उपलब्ध नसल्याने हा विभाग दुर्लक्षित कसा राहतो हाही विषय महत्वाचा आहे.
सेलू तालुक्यात १५५ अंगणवाडीत १५३ कार्यकर्ती तर १४३ मदतनिस आहोत यामध्ये १४ पदे आजच्या घडीलि रिक्त आहेत .तर नांदगाव ,पिंपरी बु.पिंपरी खु.खेर्डा दु.की,चिकलठाणा बु,निपानी टाकळी ,राजवाडी ,डिग्रस जहाँगीर ,खादगांव ,करजखेडा ,देवला पुनर्वसन ,अडसर ,वालूर तांदुळवाडी ,राव्हा तांडा ,गुळखंड फाटा ,गुळखंड ,हिस्सी ,डासाळा ,तिडी पिंपळगाव ,लाडनांद्रा , शिंदे टाकळी,धनेगांव ,कुंडी या गावातील २५ अंगणवाड्याना ईमारत नसल्यामुळे त्यांना ग्रामपंचायत किंवा शाळांमध्ये अंगणवाडी भरवावी लागत आहे.कित्तेक वर्षापासून ईमारत नसलेल्या गावांची यादी वारंवार वरिष्ठांना पाठवण्यात येते मात्र प्रत्यक्षात याबाबत कार्यवाही होत नाही.याकडे लोकप्रतिनिधी सह संबंधित अधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
जागेचा प्रश्न सुटेना ...तालूक्यातील ७ अंगणवाडी ईमारत बांधकमासाठी निधी मानव विकास योजनेंतर्गत उपलब्ध होता पण त्यासाठी लागणारी जागा ग्रामपंचायत किंवा गावातील दानशुर व्यक्तींनी दानपत्र करून देणे आवश्यक आहे.जागा देण्यासाठी कोणीही पुढे येत नाही त्यामुळे अंगणवाडी ईमारत उभी राहू शकत नाही.हा निधी वेळेत खर्ची न पडल्याने परत गेला आहे अशी प्रतिक्रिया सेलू येथील प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी के.ए. पारधी यांनी दिली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें