रॅलीने स्वच्छता हिच सेवा २०१८ अभियान उपक्रमाचा नागरिकांपर्यंत संदेश ;
सिल्लोड : प्रतिनिधी (दि. १९ ) - सिल्लोड नगरपरिषद स्वच्छ व सुंदर शहर संकल्पना कृतीत उतरविण्यात कुठेही कमी पडलेली नाही. विविध उपक्रम व माध्यमातून नेहमीच अग्रेसर असुन स्वच्छता राबवून शहरातील प्रत्येक नागरिकांनी आपापल्या घरांसभोवतालचा परिसर स्वच्छ ठेऊन नगरपरिषदेला सहकार्य करावे, किमान आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवल्याने शहर घाण कचरा मुक्त ठेवण्यात मोलाची मदत होईल. स्वच्छतेच्या अभियानाने दुर्गंधी हद्दपार होईल व संसर्गजन्य रोगांना आळा बसुन नागरिकांचे आरोग्यदायी राहण्यास मदल होईल असे मत नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी व्यक्त केले.
सिल्लोड नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) स्वच्छता हिच सेवा २०१८ या उपक्रमांतर्गत राबविण्यात येत आहे. या स्तुत्य व आरोग्यदायी उपक्रमात सर्व नागरिक , विविध सामाजिक संघटना, बचत गट, शाळा, महाविद्यालय शासकीय निमशासकीय यंत्रणा, व्यापारीवर्ग उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन शहर स्वच्छता अभियान सतत राबवित आहेत. आपल्या शहराला स्वच्छ व सुंदर शहर बनविण्यासाठी मोलाचे सहकार्य मिळत असल्याचे मत नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी व्यक्त केले.
मंगळवार (दि.१९ )रोजी शालेय विद्यार्थ्यांची स्वच्छता प्रभातफेरी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सकाळी शहरातील भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते संपुर्ण शहरातून स्वच्छता प्रभातफेरी काढण्यात आली. सिल्लोड शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय , जिजामाता कन्या शाळा, नॅशनल उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नॅशनल उर्दू हायस्कुल ३६ एक्कर, नॅशनल मराठी विद्यालय जयभवानी नगर आदी शाळांमधील इयत्ता वर्ग ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसह यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला .
विद्यार्थ्यांनी प्रभातफेरीत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवित ओला कचरा - सुखा कचरा वेगळा करा, स्वच्छता अपनाओ - अपने घर को सुंदर बनाओ,सभी रोगो की एक दवाई - घर में रखो साफ सफाई , स्वच्छ भारत - स्वास्थ्य भारत अशी घोषणा देत शहरातील नागरिकांमध्ये परिसर स्वच्छतेसंदर्भात जागृती करण्यासाठी लक्ष वेधले.
नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते प्रभातफेरीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार, उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड, शांतीलाल अग्रवाल, शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ, रऊफ बागवान , संजय आरके, रईस मुजावर पठाण, सुनिल दुधे, हाजी मोबिन पटेल, अकिल वसईकर, शेख बाबर बागवान, संजय मुरकुटे, सत्तार हुसैन, मनोज कोठाळे, मधुकरराव बेंडाळे, गणेश डकले, अकिल देशमुख, अमित आरके, मतीन देशमुख, मनोहर आरके, राजेश्वर आरके, रावसाहेब सिरसाठ, जितु आरके, भावराव दुधे, फईम पठाण, रवि आरके यांच्यासह नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक कायंदे, उपमुख्याधिकारी अजहर पठाण, सुनील गोराडे, ए.एम.पठाण, सुधाकर पाथ्रीकर, नगरपरिषदचे विभागप्रमुख - कर्मचा-यांसह काँग्रेसचे पदाधिकारी - कार्यकर्ते - नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें