अपूर्वा पॉलीटेक्नीक,सेलू येथील विद्यार्थ्यांनी केली सौरउर्जा व पवन उर्जा प्रकल्पाद्वारे वीज निर्मिती. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 19 सितंबर 2018

अपूर्वा पॉलीटेक्नीक,सेलू येथील विद्यार्थ्यांनी केली सौरउर्जा व पवन उर्जा प्रकल्पाद्वारे वीज निर्मिती.



सेलू प्रतिनिधी.
सेलू अभियंता दिनाचे औचित्य साधून श्रीराम प्रतिष्ठान संचालित अपूर्वा पॉलीटेक्नीक विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी सौर सौरउर्जा प्रकल्पाद्वारे वीज निर्मिती तयार केली असून या प्रकल्पाचे उदघाटन श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ.संजय रोडगे यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी श्रीराम प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे , प्राचार्य प्रा.अशोक बोडखे,प्रा. गजानन जाधव ,प्रा. नारायण व्यवहारे ,प्रा. पुनम पवार, प्रा. विष्णू ताठे , प्रा. श्याम वाघ , प्रा. प्रणाली लाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रकल्पाद्वारे आपण १ किलोवॅट ऊर्जानिर्मिती तयार करण्यात आली म्हणजे एका दिवसात पाच युनिट उर्जा तयार करणार असून या प्रकल्पाची कार्यक्षमता २५ वर्ष वारंवारता देणार आहे.या प्रकल्पावर वातावरणातील बदलाचा कसलाही वाईट परिणाम होत नाही.एका दिवसात जेवढी कार्यक्षमता आहे तेवढीच कार्यक्षमता आपणाला सातत्याने भेटते.या प्रकल्पात ३ किलोवॅट १ इन्व्हर्टर आणि १२ होल्ट १५० अँपिअर/तास क्षमता असलेल्या ४ बॅटरीज वापरलेल्या आहेत.
या प्रसंगी बोलताना श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ.संजय रोडगे म्हणाले की, खरा अभियंता तो असतो जो पुस्तकी ज्ञानाचा वापर करून ते प्रत्येक्षात कृती मध्ये उतरवतो.भविष्यात त्यांनी असेच उपक्रम महाविद्यालयात राबवावे असा सल्ला या निमित्ताने विद्यार्थ्यांना दिला.
अपूर्वा पॉलीटेक्नीक,सेलू येथील विद्यार्थ्यांनी या प्रकल्पाद्वारे संदेश दिला की,सर्वांनी पारंपारिक उर्जा स्त्रोताचा वापर करून पर्यावरणाची काळजी घ्यावी आणि विजेचा जपून वापर करावा.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें