सावळीविहीर (प्रतिनीधी)-कु.किरण जाधव.
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प राहाता अंतर्गत पोषण अभियान कार्यक्रम अंतर्गत सावळीविहीर बुद्रुक येथे ग्रामपंचायत सावळीविहीर बुद्रुक च्या सहकार्याने पोषण मेशावा कार्यक्रम घेण्यात आला.0 ते 6 वयोगटातील लाभार्थी, गरोदर स्त्रिया, स्तन्दा माता, किशोरवयीन मुलींसाठी पूरक पोषण आहार,लसीकरण, आरोग्य तपासणी, आहार व आरोग्य शिक्षण याचे मार्गदर्शन व सर्व वयोगटीतील मुल,मुली,महिला व पुरुष यांचे पोषण व्यवस्थीत व्हावे व आरोग्य चांगले रहावे यासाठी ही मोहिम स्वरुपात राबवली जात आहे. हे एक जन आंदोलन व्हावे यासाठी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प राहाता,पंचायत समिती राहाता व ग्रामपंचायत सावळीविहीर बुद्रुक यांच्या वतीने हे अभियान सही पोषण-देश रोषण,घरा घरात पोषण उत्सव,लेक वाचवा लेक शिकवा या घोषणांनी या अभियान मेळाव्याची सुरवात झाला.पोषण सावळीविहीर येथे सुरु झाले आहे.एक सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या काळात हा पोषण उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.येथील हनुमान मंदिरातील सभागृहात राहाता पंचायत समिती सभापती सौ.हिराबाई कातोरे,पंचायत समिती सदस्य ओमेश जपे,बाजार समिती चे संचालक बाळासाहेब जपे,सरपंच रुपाली आगलावे,उपसरपंच वृषाली जपे,राहाता तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी सौ.कुसुम नागरे यांच्या उपस्थीतीत या पोषण उत्सव अभियान मेळावा कार्यक्रम संपन्न झाला.या वेळी महिलांना मार्गदर्शन करताना सभापती कातोरे म्हणाल्या की,गरोदर महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत योग्य आहाराचे निय़ोजन करुन त्याचे सेवन केल्यास येणारी पिढी ही सुदृड आणि सशक्त तयार होईल यासाठी शासनाकडुन राबविण्यात येणार्या या पोषण उत्सव अभियानात तज्ञांकडुन मार्गदर्शन करण्यात येत आहे तरी सर्वांनी याचा पुरेपुर लाभ घ्यावा.पंचायत समिती सदस्य ओमेश जपे म्हणाले की,महिलांनी त्यांच्या हिमोग्लोबीनची वेळोवेळी तपासणी करुन आपली काळजी घ्यावी.यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा व अंगणवाडी सेविकांशी संपर्कात रहावे.मुलींना शिकण्यासाठी पालकांनी पुढाकार घेवुन मुलींना सन्मानाने वागणुक द्यावी.या उत्सव समारंभात महिलांसाठी आयोजीत आहार प्रदर्शनाचे उद्घाटन सभापती कातोरे यांच्या हस्ते झाले.यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षीका उमा खोले,मंगल मगर,मंगल राजळे,अलका दिघे,उषा कासार,अर्चना गवारे,मीना तांबे,शिक्षण विस्तार अधिकारी वाकचौरे,मुख्याध्यापक पी.के.राऊत,दत्ता गायकवाड,गणेश आगलावे,संतोष आगलावे,स्वप्नील पारडे,रोहिणी जपे,पद्माबाई वाघमारे,पोलिस पाटील संगिता वाघमारे,सारीका वाघमारे,सर्व ग्रामपंचायत सदस्य,अंगणवाडी सेविका,आशा सेविका ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.प्रास्ताविक उमा खोले,सुत्रसंचालन आर.बी.शेख यांनी केले तर आभार बाजार समितीचे संचालक बाळासाहेब जपे यांनी मानले.या अभियात जिल्हा परिषद व न्यु इंग्लीश स्कुल च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवुन गावातुन पोषण रॅली काढली होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें