सोनपेठ(राजेश खेडकर) दि.१९सप्टेंबर २०१८
शहरातील शारदा नगर व श्री महालिंगेश्वर नगर येथे स्थापित श्री मोरया गणेश मंडळाच्या वतीने अथर्वशीर्षाचे वाचन करण्याचा राबविण्यात आला आहे. दि.१९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ०७वाजता झालेल्या या कार्यक्रमास पुरुष, महिला व बालकांचाही मोठ्याप्रमाणात सहभाग होता. यावेळी सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीने आगामी वाचन प्रेरणा दिनासाठी ग्रंथ भेट देण्यासाठी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत मंडळाने ग्रंथ भेटही दिली आहे.
या प्रसंगी श्रीकृष्ण महाराज जोशी, सेवानिवृत्त शिक्षक वसंतराव चिलवंत, ग्रंथ वाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश्वर खेडकर, सदस्य तथा पत्रकार राधेश्याम वर्मा, अरुण रत्नपारखे, राधाकृष्ण हिक्के पाटील, रोटरी क्लब सोनपेठचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, चोरमारे सर, जगन्नाथ घोडके, जगन्नाथ घोडके, भगवानराव मोहीते, सुधाकर तांदळे, नागनाथ महाराज स्वामी आदींसह मंडळाचे युवा कार्यकर्ते मयुर शर्मा, पप्पू राठोड, सुरज गायकवाड, अक्षय लांडे, संदीप लष्करे, सदानंद जोशी, महादेव काटे व धनंजय मोहिते आदींंसह दोनही नगरातील महिलांं व बालकांंची मोठ्याप्रमाणात उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक संदीप लष्करे यांनी केले तर ग्रंथ वाचन चळवळीच्या आवाहनास प्रतिसाद देऊन चळवळीस ग्रंथ भेट दिल्याबद्दल अध्यक्ष राजेश्वर खेडकर यांनी मोरया गणेश मंडळाचे आभार व्यक्त करून शहर व परीसरातील अन्य गणेश मंडळांनी सुध्दा अशाप्रकारचे उपक्रम राबवून जिल्ह्यात सोनपेठचा आदर्श निर्माण करावा असे आवाहन केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें