सेलू प्रतिनिधि
सेलू येथील शादिखाना येथे रविवार दिनांक 02/09/2018 रोजी नवं निर्वाचित आ बाबाजानी यांचा नागरी सत्कार करण्यात आला या वेळी पाथरी येथील अनिल नखाते परभणी मनपा नगरसेवक गौस ज़ैन न प उपाध्यक्ष प्रभाकर सुरवसे नगरसेवक पठाण रहीम खान नगरसेवक शेख रहीम नगरसेवक शेख कासिम नगरसेवक गौतम धापसे गुत्तेदार् शेख कौसर मुकेश बोराडे मौलाना तजम्मुल खान मौलाना सादिक़ नदवी मंच वर उपस्थित होते
या वेळी शहरातील विविध पक्षाचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक व्यापारी मुस्लिम समाजातील बहू संख्येत नागरिक उपस्तित होते
सत्कारला उत्तर देतांना आ बाबाजानी म्हणाले समाजात कमी शिक्षण असल्याने हा समाज मागासलेला असून समाजाने आपल्या मुलांना भरपूर शिक्षण देऊन मोठ्या पदावर पाठवावे ग्रामीण विभागातील मराठी शिक्षण वर भर देत आहे व् शहरातील लोक उर्दू भाषेत शिक्षण देत असल्याने शहरी भागातील लोक हे नोकरी पासून दूर गेलेला आहे ग्रामीण भागतील समाज मराठी भाषे वर प्रभुत्व आहे जो पर्यंत समाज मधील विचार बदलत नाही तो पर्यंत समाज सुधरणार नाही समाजात विचारात बदल करणे गरजेचे असून आपल्या पाल्यांना राज्य भाषेत शिक्षण द्यावे सरकार ज्या भाषे त व्यवहार करतो त्याच शिक्षनास भर द्यावे ज्या वेळेस मुघलांचे राज्य होते त्या वेळेस पारशी शिक्षण घेऊन काही लोकांनी नोकरी व सत्तेत भाग घेतला नंतर निजामा चे राज्य आले त्या वेळेस काही हिंदू समाजाच्या लोकांनी उर्दू चे शिक्षण घेऊन सत्तेत सह भाग मिळाले तर आज राज्य आपले मराठी भाषेत आहे तर सर्वांनी मराठी भाषा अवगत करावी जेणे करून हिंदू- मुस्लिम यांचे विचारांची देवाण घेवाण होईल व जो पक्ष समा जात तेड निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजत आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सविधांनात धार्मिक स्वतत्र आहे हा देश विविधतेने नटलेले आहे समाजात गुण्यागोविंदाने राहण्या साठी मराठी भाषा येणे फार गरजेचे आहे यूपीसी एमपीएससी परीक्षा चे जे पेपर येतात ते फक्त मराठी व इंग्रजी त उर्दू भाषे च्या विद्यार्थ्यांना काही प्रश्न समजत नाही त्या साठी त्यांनी मराठी शिक्षण घेणे जरुरी आहे तसेच अरबी मदरसा मध्ये ही मराठी चे शिक्षण द्यावे असे आव्हान केले भारतीय संविधानात शिक्षणात सर्वांना सारखा अधिकार दिला असून सर्व समाज
बांधवांनी याचा भरपूर फायदा उचलावे परभणी जिल्ह्यातील पहिला मुस्लिम आमदार आहे की जो आमदार मधून निवड झाली व देशाचे नेते मा श्री शरद पवार साहेबानी माझ्यावर जो विश्वास दाखवून मला आमदार केले तसेच राष्ट्रवादी पक्षाने मुस्लिम समाजाला संधी दिल्या मुळे कांग्रेस ने सुद्धा पुसद येथील आमदार वजहत मिर्जा यांची निवड केली
2019 ला राज्यात व् देशात कांग्रेस व् राष्ट्रवादी कांग्रेस चे सत्ता येणार असून येणाऱ्या निवडणुकीत सर्व समाज बांधवांनी सेकयूलर पक्षाचे उमेदवारांना मतदान करावे
सूत्रसंचलन मुफ़्ती मारूफ़ अन्सारी यांनी केले तर आभार सत्कार कार्यक्रम चे संयोजक नगरसेवक अ वहीद अन्सारी यांनी मानले.
या वेळी नगर परिषदेच्या वैशिष्ट्य पूर्ण निधी तुन तयार केलेल्या शदिखाना परीसरात नवीन हाल चे उदघाटन मान्य वराचे हस्ते करण्यात आले व् हा परिसरपुन्हा सुशोभित होणार आहे असे संयोजन समिती श्री मुकेश बोराडे, व व हि द अन्सारी यांनी सांगितले.
सेलू विधान परिषद चे नवं निर्वाचित आ बाबाजानी दुराणी यांचा सत्कार करताना नगरसेवक श्री वहिंद अन्सारी , मौलाना तज्जूमल, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्री मुकेश बोराडे, पाथरी कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती श्री अनिलराव नखाते दिसत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें