सेलूकरांच्या वतीने केरळ पुरग्रस्तासाठी 5 लाख 41 हजाराचा निधी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 3 सितंबर 2018

सेलूकरांच्या वतीने केरळ पुरग्रस्तासाठी 5 लाख 41 हजाराचा निधी.



सेलू प्रतिनिधी शमशेर खान.

सेलू शहरातील विविध क्षेत्रातून    शनिवारी एक सप्टेंबर रोजी केरळ येथील पुरग्रस्तांसाठी सेलूकरांच्या वतीने 5 लाख 41 हजार रुपयाचा निधी धनादेशाद्वारे समन्वय समितीच्या सदस्यांकडे सुपूर्द करण्यात आला.

केरळ राज्यात झालेल्या महाप्रलयाच्या पुरात न भरुन निघणारे अार्थिक नुकसान झाले आहे. केरळ राज्याच्या मदतीसाठी देशभरातून मदतीचे हात पुढे येत आहेत. नेहमीच समाज कार्यात अग्रेसर असलेल्या सेलूकरांनीही मागे न राहता समन्वय समितीच्या माध्यमातून शहरात मदत फेरीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शहरातील सर्व पक्षाचे पदाधिकारी, समाजिक, व्यापारी, जेष्ठ नागरीक, डॉक्टरर्स , याच्यासह विविध संघटनांना केरळ येथील पुरग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. सेलूकरांनीही या आवाहनाला मोठा प्रतिसाद दिला. नगरपालिकेच्या वतीने एक लाख रुपये तर पालिकेच्या कर्मचारी बंधुंनी आपला एक दिवसाचा पगार 1 लाख 547 रूपये असा एकूण 2 लाख 547 रुपयांचा धनादेश दिला. साईबाबा नागरी बँकेच्या कर्मचा-यांनीही एक दिवसाचा पगार व् शहरातील मुस्लिम बांधवाच्या वतीने शहरातल्या सर्व  मस्जिद मध्ये 40000 चालीस हजार रूपये गोळा करून पुरग्रस्तांसाठी दिला. तसेच शहरातील शाळा, कॉलेज, प्रतिष्ठाने, व्यापारी असोसिएशन, व्यापारी महासंघ, डाॅक्टर्स असोसिएशन, कृषी उत्पन्न बाजार समिती, मेडिकल असोसिएशन, श्रीराम प्रतिष्ठान, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच वयक्तिकांनीही सढळ हाताने मदत केली. यात 5 लाख 41 हजाराचा निधी संकलन झाला आहे. हा सर्व निधी धनादेशाद्वारे समन्वय समितीकडे सुपूर्द करण्यात आला आहे. यावेळी नगराध्यक्ष विनोद बोराडे, साईबाबा बँकेचे चेअरमन हेमंतराव आडळकर, त्रिंबकबापू बोराडे, चंद्रशेखर मुळावेकर, दत्तात्रय आंधळे, छगन शेरे, रामकृष्ण शेरे, दत्तुसिंग ठाकूर, पालिकेचे मुख्य लेखापाल अशोक कासार, रामराव पवार, अॅड. उमेश खारकर, अॅड. लहरचंद खोना, संतोष सोमाणी, मिलिंद सावंत, नगरसेवक पठाण रहीम  खान  अबरार बेग शेख इसाक , आयुब पठाण,  राजेंद्र केवारे आदींची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें