एक कोटी 83 लक्ष रूपयांच्या कामाचे लोकार्पण.गटनेते राम पाटलांचा पुढाकार ; विविध गावात विकास कामे. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 3 सितंबर 2018

एक कोटी 83 लक्ष रूपयांच्या कामाचे लोकार्पण.गटनेते राम पाटलांचा पुढाकार ; विविध गावात विकास कामे.



डिग्रस जहागिर येथे बंधाऱ्यामुळे गावाचा पाणी प्रश्न मिटला.



सेलू : प्रतिनिधी शमशेर खान

 सेलू तालूक्यातील विविध गावामध्ये जि. प. गटनेते तथा शिवसेनेचे विधानसभा प्रमुख राम ( नाना ) पाटील यांच्या पुढाकाराने एक कोटी 83 लक्ष रूपयांच्या विकासकामाचे लोकार्पण करण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती आशी की, परभणी जिल्हा परिषदे अंतर्गत सेलू तालूक्यातील देऊळगावगात  येथे बारा लक्ष रूपयांचे दलित वस्तीत रस्ता व नाली काम करण्यात आले गावकऱ्यांना दिलेल्या शब्दाला राम नाना पाटील यांनी वचन दिल्याप्रमाणे गावातील दलित वस्तीला व नाली बांधकाम ला निधी देण्यात आला. तसेच खवणे प्रिंप्री दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत येथे दहा लाखांचे रस्ता व नाली काम, राधेधामणगाव येथे वीस लाखांचे रस्ता व बंधारे यामुळे गावातील पाण्याचा प्रश्न तसेच बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना हिवाळ भरणे व उन्हाळ्यात पाण्याच्या प्रश्नामुळे बंधाऱ्यामुळे गावातील पाणीप्रश्न मार्गी लागला तसेच अनेक वर्षापासून जिल्हा परिषद शाळा हिस्सी वर्गखोली चे बांधकाम नादुरुस्त असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी नाहक त्रास सोसावा लागत होता त्यामुळे गावकऱ्यांच्या मागणी ना राम नाना पाटील यांनी पाच लाखांचे काम, म्हाळसापुर रस्ता मजबुतीकरण आला शाळा दुरुस्ती सभामंडप येथे नऊ लाखाचे काम, वाघ प्रिंप्री दलित वस्ती येथे पाच लाखांचे काम तर डिग्रस येथे पाच लाखांचे कामे करण्यात आली.
तसेच जलयुक्त शिवार अंतर्गत तीन गावामध्ये 1कोटी 4 लाखांची कामे पूर्ण करून तालूक्यात विकास कामांचा धडाका उडवून राम नाना पाटील यांनी जनतेच्या विश्वासास पात्र ठरले आहेत. जनतेच्या प्रश्नाला स्वतःच वाचा फोडून जिल्हा परिषद सर्कल मधील विविध विकासकामांना सन दोन हजार सतरा अठरा वर्षात देऊळगाव गात सर्कलमधील विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले
विकासात्मक दृष्टिकोन ठेवून राजकीय वाटचाल करणार असल्याचे राम पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.


मी जनतेला शब्द दिला आणि जनतेनी मला निवडून दिले.......... राम नाना पाटील

देऊळगाव गात या सर्कलमध्ये 2017- 18 या वर्षामध्ये जवळपास दोन कोटींची विकासकामे राम नाना पाटील यांनी करून दाखवली यामुळे 4 जिपच्या सर्कलच्या विकासापेक्षा सर्वात जास्त विकास देऊळगाव सर्कलमध्ये राम नाना पाटील यांनी करून दाखवला शिवसेनेने राम पाटील यांच्यावर केलेला विश्वास आणि जनतेने केलेला भरोसा याला कधीही तडा जाऊ देणार नाही असा विश्वासही राम नाना यांनी यावेळी जनतेला विकास कामातून दिला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें