पेट्रोल पंपावरील चोरी प्रकरणी पाच संशयीतांचा पोलिसांकडून तपास . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 13 सितंबर 2018

पेट्रोल पंपावरील चोरी प्रकरणी पाच संशयीतांचा पोलिसांकडून तपास .



वालुर येथील तोष्णीवाल पेट्रोल पंपावरील चोरी प्रकरण.


 सेलू प्रतिनिधी

सेलू : तालुक्यातील वालुर येथील तोष्णीवाल यांच्या पेट्रोल पंपावरील चोरी प्रकरणी पोलिसांनी पेट्रोल पंपावरील नौकरासह पाच जणांना तपासकामी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु असल्याची माहिती या चोरी प्रकरणाचा तपास करणारे पोलिस निरीक्षक संदिपान शेळके यांनी बुधवार १२ सप्टेंबर रोजी दिली.

याबाबतची माहिती या प्रमाणे, वालुर येथील तोष्णीवाल यांच्या पेट्रोल पंपावर मंगळवारी मध्यरात्रीनंतर चोरीची घटना घडली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. वरिष्ठ अधिकारी देखील या चोरीच्या प्रकरणाचा तात्काळ छडा लागावा म्हणुन प्रयत्नात आहेत. सेलू पोलिसांनी या चोरी प्रकरणी पेट्रोल पंपावर घटनेच्या दिवशी असलेल्या नौकर व इतर संशयीत अशा पाच जणांना चौकशीच्या कामी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशीत नेमके काय निष्पन्न झाले याची माहिती सुरु असलेल्या तपासात व्यत्यय येऊ नये म्हणुन स्पष्ट केली नाही. परंतू अधिकृतपणे अद्यापही चोरी प्रकरणी कोणासही ताब्यात घेण्यात आली नसल्याची माहिती या चोरी प्रकरणाचा तपास करणारे पोलिस निरीक्षक संदिपान शेळके यांनी दिली. या पेट्रोल पंपावरील चोरीनंतर तपासाची दिशा नेमकी समजु शकली नाही. तरी चोरीच्या तपासकामी ताब्यात घेतलेल्या पाच जणांचे नेमके काय म्हणणे आहे  कि या शिवाय इतर आरोपी या प्रकरणात आहेत ेहे पोलिस तपासानंतरच स्पष्ट होईल. अद्यापतरी ठोस असे काहीच पोलिसांच्या हाती लागले नसल्यामुळे कोणासही ताब्यात घेतले नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
ती महिला कोण ? वालुर येथील पेट्रोल पंपावरील झालेल्या चोरीच्या घटनेनंतर वालुर - सेलू या रस्त्यावरुन एका कारमधुन काही तरुणांसह एक महिला सेलूकडे येत होती. एवढ्या रात्री आणि चोरीची घटना घडल्यानंतर तरुणांसह एकटी असलेली ही महिला नेमकी कोण आहे? याबद्दल तिची आणि सोबतच्या तरुणांची चौकशी झाली असती तर पेट्रोल पंपावरील झालेल्या चोरीच्या चर्चेएवढीच गाजत असलेली चर्चा म्हणजे ती महिला कोण? अशी सेलूसह वालुरात चर्चा होत आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें