सेलू!प्रतिनिधी
तालुक्यातील वालुर येथे एका इसमाने लिंबाचा झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दि.११सप्टेंबर रोजी उघडकीस आली आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील वालुर परिसरात शेतातील लिंबाचा झाडास पांडुरंग दगडोबा हेगडकर वय ३३वर्षे या इसमाने फाशी घेवून आत्महत्या केली असल्याची घटना घडली. सदरिल घटना एकदोन दिवसा पूर्वी घडली असावी मयताचे संपुर्ण शरीर पुर्णतः फुगले असल्याने घटना स्थळीच शवविच्छेदन करण्यातआले. उ मयत पांडुरंग हा काही दिवसांपासून घरातुन निघून गेला होता. त्याच्या आत्महत्यचे नेमके कारण मात्र स्पष्ट झाले नाही. गळफास घेतलेल्या घटनास्थळच्या शेताचा मालक शेषराव धाबे यांनी दिलेल्या माहिती वरून पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढिल तपास साहेबराव चौरे हे करीत आहे वालुरा या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें