सोनवटी परिसरात बिबट्याने हरीन, शेळी, कुत्र्याच्या पाडला फडश्या. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 13 सितंबर 2018

सोनवटी परिसरात बिबट्याने हरीन, शेळी, कुत्र्याच्या पाडला फडश्या.



नागरिक भयभीत, मजुरांनी कामे सोडली, वनकर्मचारी अनभिज्ञ.



सेलू प्रतिनिधी.

तालुक्यातील सोनवटी परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याने मागील आठवड्यात हरिण, शेळी व एक कुत्र्याचा फडशा पाडल्या मुळे सोनवटी सह परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे याबाबतची माहिती या प्रमाणे तालुक्यातील सोनवटी येथे बिबट्या सदृश्य प्राणी सोयाबीनच्या पिकात असल्याचे शेतकरी जनार्दन सोळंके यांनी दृष्टीस पडलेल्या बिबट्याचे  दूरवरून छायाचित्र घेतले परंतु यावर कोनाचा फारसा विश्वास बसला नाही.
 सोनवटी परिसरात हरणाचे मांस खालेल्या सांगडा
 बरोबरच राधाकिशन ग्‍यानोजी डोईफोडे यांची एक शेळी, हरिभाऊ डोईफोडे यांच्या शेतातील आखाड्यावर वरील कुत्रे लचके तोडलेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे खरंच बिबट्याचा या परिसरात वावर असल्याचे स्पष्ट झाले जनार्दन सोळंके या शेतकऱ्यांनी काढलेला फोटो आणि त्यानंतर हरिण शेळी आणि कुत्र्याचे लचके तोडलेल्या सांगड्या मुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे या घटनेनंतर शेतातील मजुरांने भीतीपोटी कामे सोडली तर मजूरासह  नागरिकांत या प्रकाराने घबराट निर्माण झाली आहे. तर वन विभागाच्या  अधिकाऱ्यांना मात्र या बिबट्या सदृश्य प्राण्या बद्दल कसल्याही प्रकारची माहिती नाही एकंदरीत सोनवटी परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्यामुळे दहशत पसरली असून तात्काळ या बिबट्याच्या  बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी सोनवडी परिसरातील शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें