सेलू प्रतिनिधी
सेलू : अहिल्या क्रांती
महिला विकास प्रतिष्ठान प्रणित
क्रांती सेनेच्या सेलू तालुका
कार्यकारणीची निवड नुकतीच
जाहीर करण्यात आली.
सेलू तालुकाध्यक्ष पदी
बापुराव काळे यांची निवड झाली
आहे. रविवार २ सप्टेंबर रोजी
अहिल्या क्रांती सेनेच्या
कार्यालयात बैठक पार पडली.
अध्यक्षस्थानी सौ. गंगासागरताई
वाळवंटे यांची उपस्थिती होती.
तालुका कार्याध्यक्षपदी विजय
गायकवाड, सल्लागार पंडीत
जगाडे, तालुका संघटक प्रल्हाद
लेंगुळे, शहराध्यक्ष माणिक
पडुळे, शहर उपाध्यक्ष शाम
शेळके, सदस्य म्हणुन विष्णु
कोरडे, ज्ञानेश्वर हिंगे, सुहास
गणगे, विष्णु बादाङ, मगवान
बोबडे यांची नियुक्ती करण्यात
आली.
नवनियुक्त पदाधिकार्यांचे
मराठवाडा अध्यक्ष गंगासागर
वाळवंटे, तालुकाध्यक्ष महादेव
गायके यांच्याहस्ते स्वागत
करण्यात आले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें