सामान्यांच्या प्रश्नाशी सरकारला देणे नाही-संग्राम कोते पाटील ◆राष्ट्रवादी युवक काँग्रेस मेळावा संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 30 सितंबर 2018

सामान्यांच्या प्रश्नाशी सरकारला देणे नाही-संग्राम कोते पाटील ◆राष्ट्रवादी युवक काँग्रेस मेळावा संपन्न.




सेलु(प्रतिनिधि)

सेलू पैशाच्या जोरावर सत्तेत आलेल्या भाजपा सरकारला सर्व सामान्याच्या प्रश्नाशी देणे घेणे नसुन सरकारने चार वर्षात काहीच केले नसुन येणा-या निवडणुकीत मतदार या सरकारला धडा शिकवेल असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी केले ते रविवार 30 रोजी हादगाव(पावडे) ता. सेलु येथे आयोजीत युवक मेळाव्यात बोलत होते. यावेळी आमदार विजय भांबळे, जि. प. सभापती अशोक काकडे, जि. प. सदस्य राजेंद्र लहाने, रामराव उबाळे, अँड. बालासाहेब रोडगे, सारंगधर रोडगे, शांतीस्वरुप जाधव, सुर्यकांत हाके, दत्तराव मोगल, प. स. सभापती पुरुषोत्तम पावडे,माऊली ताठे, सुधाकर रोकडे, मनोज थिटे, अजय डासाळकर, भारत इंद्रोके, सचिन बोबडे, शिवराम कदम, सचिन शिंदे, भारत कदम आदींची उपस्थिति होती.पुढे बोलतांना संग्राम कोते म्हणाले की,केंद्र व राज्यातील सरकार हे सर्वसामान्यांच्या विरोधातील सरकार आहे. सत्ता आणि पैशांच्या जोरावर ते निवडणुका जिंकत आहे. जनता भाजपला कंटाळली आहे. आगामी निवडणुकांमध्ये सत्तांतर अटळ आहे त्यामुळे हीच योग्य वेळ आहे, या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करा,  युवकच देशाचा पाया असून म्हणूनच भारताला युवकाचा देश म्हटले जाते हे सरकार युवकांसाठी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील नाही त्यामुळे युवकांचे प्रश्न सोडवायचे असेल तर आपणास लढा देणे गरजेचे आहे असे आवाहन युवकांना केले.
 तसेच शेतकरी, युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांशी सरकारला काही देणे घेणे नाही, आगामी निवडणुकांसाठी जोमाने कामाला लागावे. युवा कार्यकर्ता हा पक्षाचा पाया असतो, तो मजबूत असेल तर पक्ष टिकतो. जनसामान्यांचे प्रश्न घेऊन या निष्क्रिय सरकार विरुद्ध युवकांनी रस्त्यावर उतरून आवाज उठवावा. २०१९ साली सत्ता येण्यापासून व अजितदादांना मुख्यमंत्री करण्यापासून कुणी रोखू शकत नाही, असा विश्वास आ.विजय भांबळे यांनी व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने युवक कार्यकर्त्यांची उपस्थिति होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें