श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने केरळमधील पुरामुळे आपद्ग्रस्‍त झालेल्‍या पुरग्रस्‍तांसाठी ५ कोटी रुपयांची मदत. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 30 सितंबर 2018

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने केरळमधील पुरामुळे आपद्ग्रस्‍त झालेल्‍या पुरग्रस्‍तांसाठी ५ कोटी रुपयांची मदत.




सावलीविहिर,प्रतिनिधी ,किरण जाधव

         श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने केरळमधील पुरामुळे आपद्ग्रस्‍त झालेल्‍या पुरग्रस्‍तांसाठी ५ कोटी रुपयांचा धनादेश संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे व राज्‍याचे जलसंवर्धन मंत्री तथा पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी  राज्‍याचे मुख्‍यमंत्री दे‍वेंद्र फडणवीस यांच्‍याकडे सुपूर्त केला.
          याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम राज्‍यमंत्री मदन येरावार, राज्‍याचे मुख्‍य सचिव डि.के.जैन, मुख्‍यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव भुषण गगरानी, संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते.
          केरळ राज्‍यामध्‍ये मुसळधार पावसामुळे भीषण पुर परिस्थिती निर्माण झालेली होती. यामुळे केरळमधील जनजीवन विस्‍कळीत झाले होवून परिस्थिती अतिशय बिकट बनलेली आहे. या पुरामुळे लाखो नागरिक बेघर झाले असून अनेक गांवेही उध्‍वस्‍त झालेली आहेत. ही नैसर्गिक आपत्‍ती भीषण असून आपले राष्‍ट्रीय कर्तव्‍य समजुन व माणुसकीच्‍या संवेदनांना साद देऊन केरळमधील या आपत्‍तीग्रस्‍तांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी देण्‍याचा निर्णय संस्‍थानच्‍या व्‍यवस्‍थापन समितीने घेतलेला होता. त्‍यानुसार केरळमधील पुरामुळे आपद्ग्रस्‍त झालेल्‍या पुरग्रस्‍तांसाठी संस्‍थानच्‍या वतीने ५ कोटी रुपयांचा धनादेश राज्‍याचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याकडे संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे व राज्‍याचे जलसंवर्धन मंत्री तथा पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी सुपूर्त केला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें