सेलू प्रतिनिधी
सेलू : शहरातील स्वच्छतेचा उपक्रम घंटागाडीच्या माध्यमातुन नगरपालिकेने हाती घेतल्यापासुन शहर स्वच्छतेचा प्रश्न बर्याचशा प्रमाणात निकाली निघाला आहे. शहरातील १२ प्रभागात १२ घटांगाड्या आणि २४ सफाई कामगार यावर कार्यरत आहेत. ही घंटागाडीची सेवा प्रत्येक प्रभागात दिवसातुन दोन वेळा दिली जाते. पहाटे ७.३० ते ११ व दुपारी २ ते ५ या वेळेमध्ये शहरातील १२ प्रभागात १२ घंटागाडीमधुन २४ सफाई कामगार स्वच्छतेचे मोठे काम करतात ही बाब उल्लेखणीय आहे. याशिवाय मुख्य रस्ता व आवश्यत तेथे एक घंटागाडी आणि ५ सफाई कामगार स्वच्छतेचे काम प्रामाणीकपणे करीत असल्यामुळे शहरातील रस्त्यावर पडणार्या कचर्यांचे प्रमाण नगन्य झाले आहे. शहरातील नागरिकांना पुरविण्यात आलेल्या डस्बीनमध्ये ओला व सुका असा दोन प्रकारचा कचरा तेवढ्याच जबाबदारीने सेलूकर जमा करुन ठेवतात. पालिकेने सुरु केलेल्या या घंटागाडीच्या उपक्रमांमुळे लोकांनाही स्वच्छतेची चांगली सवय जडली आहे. स्वच्छता, घंटागाडी आणि कचरा या त्रिसुत्रीचा ध्यास स्वच्छ शहर करणार्या सफाई कामगारांनी मनावर घेतले असून त्यास नागरिकांचे मोठे सहकार्य लाभले आहे. शहरातुन १२ घंटागाड्यांच्या माध्यमातुन जमा होणारा संपूर्ण कचरा वालुर नाका परिसरात असलेल्या डंम्पीग ग्राऊंड (कंपोस्ट) मध्ये जमा करण्यात येतो. असा उपक्रम मागील काही महिन्यांपासुन सुरु असल्यामुळे शहर स्वच्छतेत दिवसेंदिवस सुधारणा आढळुन येत आहे.
नगराध्यक्ष विनोद बोराडे, मुख्याधिकारी देविदास जाधव आणि स्वच्छता निरीक्षक एस.बी. राठोड यांच्या सततच्या देखरेखीमुळे शहर स्वच्छ होताना दिसत आहे. याचे श्रेय मात्र सफाई कामगारांनाच जाते. घरातील घाण वाहुन नेणार्या कर्मचारी बांधव धन्यवादास पात्र आहेत.
सेलू: स्वच्छ सेलूचा ध्यास घेऊन घंटागाडीच्या माध्यमातून शहरातील १२प्रभागात स्वच्छतेची सेवा बजावणारे सफई कामगार.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें