भोकरदन प्रतिनिधी(शेख सलिम) : गणेशोत्सव शांतता व सलोख्यात साजरे करण्याची परंपरा भोकरदन शहरात आहे. शहरात सर्व महापुरुषांच्या जयंती व विविध उत्सव शांततेत साजरे केले जातात. शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून उत्सव साजरे, करून पोलिसांना सहकार्य करावे व डीजे मुक्त गणेशोत्सव साजरे करा असे आवाहन भोकरदन येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांनी भोकरदन पोलीस ठाण्यात आयोजित शांतता कमेटीत ते बोलत होते, यावेळी पुढे ते बोलताना म्हणाले की डि. जे वाजवू नये डिजेमुळे ध्वनिप्रदूषण होतात,आपल्यामूळे दुसऱ्या समाजाला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, जे मंडळ डिजे वाजवून कायद्याचे उल्लंघन करतील अशा मंडळावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची दक्षता घ्यावी , तसेच यावेळी सर्व उत्सव सण उत्सवात साजरे करण्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. सर्व धर्म उत्साहात साजरे करावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. या बैठकीमध्ये पोलीस अधिकारी, उत्सव मंडळाचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य तसेच भोकरदन शहरासह तालुक्यातील गणेशोत्सव समितीचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थिती होती. या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, न.प.चे मुख्याधिकारी अमित कुमार सोंडगे, उपानगराध्यक्ष इरफान सिद्दीकी, माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण दळवी,
नगरसेवक रणवीर देशमुख,नगरसेवक कदिर बापू, संतोष अन्नदाते ,जीवराग सर,मुजीब हाजी साहाब,शब्बीर कुरेशी,नजीर भाई, शिवसेनेचे तालुका प्रमुख महेश पुरोहित, माजी नगराध्यक्ष शेषराव सपकाळ,खरात मामा, फारुख कादरी,शेख रईस,गजू अण्णा देशपांडे,बंटी काका यांच्यासह पोलीस कर्मचारी, गणेशोत्सव समितीचे सदस्य, प्रतिष्ठित नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें