संत श्री सेना महाराज पुण्यतिथी सावलीविहिर येथे मोठ्या उत्साहात साजरी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 7 सितंबर 2018

संत श्री सेना महाराज पुण्यतिथी सावलीविहिर येथे मोठ्या उत्साहात साजरी.



सावलीविहिर  (प्रतिनिधी )
कु- किरण जाधव.
संत श्री सेना महाराज पुण्यतिथी सावलीविहिर येथे मोठ्या उत्साहात साजरी
करण्यात आली.
बहुजन श्री संत सेना महाराज हे भारतीय संत परंपरेतील थोर संत होते.
विटेवरी उभा नीट कटावरी कर । वाट पाहे निरंतर भक्ताची गे माये ॥ १ ॥
श्रीमुकुट रत्‍नाचा ढाळ देती कुंडलांचा । तुरा खोंविला मोत्याचा तो गे माय ॥ २ ॥
कंठी शोभे एकावळी । तोडर गर्जे भूमंडळी । भक्तजनाची माउली तो गे माये ॥ ३ ॥
सोनसळा पीतांबर । ब्रीद वागवी मनोहर । सेना वंदि निरंतर तो गे माय ॥ ४ ॥ असे बोलून राहता
कृषी बाजार समितीचे संचालक बाळासाहेब जपे म्हणलेकी
बहुजन श्री संत सेना महाराज हे भारतीय संत परंपरेतील थोर संत होते.
 संत सेना महाराज मध्यप्रदेशातील बांधवगड संस्थानातील ईरची या गावी महाराजांचा जंन्म झाला.
सेना महाराजांचे वडील देविदास बांधवगडच्या राजाकडे नाभिकाचे काम करीत असत.
 आई प्रेमकुंवरबाई सात्विक स्वभावाची गृहिणी होती.
 वडील देविदासानंतर परंपरेनुसार राजाकडील नाभिकाचे काम सेना महाराजांकडे आले. सेना महाराजांचा लहानपणापासूनच  मानवता मार्गाकडे ओढा होता. त्यांच्या हिंदी मातृभाषेतून ते न्यायिकरचना सुध्दा करु लागले. कालांतराने महाराष्ट्र्रातील त्या काळच्या संतांची माहिती सेना महाराजांना मिळाली. त्या संतांच्या व पंढरपूरच्या विठ्ठल भेटीसाठी ते आतूर झाले.
विचारांची तिर्थयात्रा करित करीत ते इकडे आले संत ज्ञानेश्र्वर, संत नामदेव, भोजलिंगकाका व इतर त्यांचे समकालीन संत होते. या महान संतांच्या सान्निध्यात येऊन ते महाराष्ट्र्राच्या पावनभूमीत रममाण झाले.
त्यांनी मराठी भाषा आत्मसात करुन मराठी भाषेवर इतके प्रभूत्व मिळविले की मराठी भाषेत त्यांनी अनेक उत्कृष्ट अभंगांची निर्मिती केली. वारकरी भक्तीरसात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. ग्रामविकास अधिकारी खर्डे यांनी सर्वांना शुभेच्छा देऊन म्हणलेकी
एका हिंदी भाषिक संतांची मराठी भक्तीरचना वाचताना महाराष्ट्र्रातील वारकरयांना जरासुध्दा वेगळेपण जाणवत नाही. संत नामदेव  तुकारामाइतकेच संत सेना महाराजांना श्रेष्ठ मानले जाते. संत सेना महाराजांचे अभंग मोठया आवडीने आजतागायत गायले जात आहेत. संतांना प्रदेश, भाषा, जातपात यांच्या मर्यादा नसतात हेच यावरुन सिध्द होते. असे शेवटी ते म्हणाले  यावेळी बिडवे ,कदम, सह संतोष आगलावे ,राजेंद्र आगलावे ,संतोष गायकवाड,प्रमोद कोपरे ,आहिरे,आदींसह,भाविक मोठ्या संख्येने उपस्तीत होते  भक्ती मंडळ ,ग्रामस्थ ,महिला मंडळ यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें