सराटी येथील ग्रामसेवक ग्रामसभा घेत नसल्याची तक्रार; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 6 सितंबर 2018

सराटी येथील ग्रामसेवक ग्रामसभा घेत नसल्याची तक्रार;


दलित वस्ती सुधार योजनांतर्गत कामांची चौकशी करण्याची गटविकास अधिका-यांकडे मागणी;

सिल्लोड (प्रतिनिधी)दि 06
सराटी येथील ग्रामसेवक ग्रामसभा न घेता कागदोपञीच ग्रामसभेचे नियोजन करीत असुन शासकीय योजनांची कुठलीही माहिती दिली जात नसल्याची तक्रार सराटी येथील ग्रामस्थ पांडुरंग लक्ष्मण कांबळे यांनी गटविकास अधिकारी सिल्लोड यांच्याकडे तक्रारीद्वारे केली असुन दलित वस्ती सुधार योजनांतर्गत झालेल्या कामांचीही चौकशी करण्यात यावी असी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.
सराटी येथे अनेक वर्षांपासून ग्रामसेवक सचिन रिंढे कार्यरत आहेत.सराटी येथे वर्षभरापासुन ग्रामसभेचे नियोजन करण्यात आले नाही. फक्त कागदोपञीच ग्रामसभेचे आयोजन केले जाते. मी अनुसूचित जाती मधील दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती असुन ग्रामसेवक कोणत्याही शासकीय योजनांची माहिती देत नाही व विचारणा केल्यास तुच्छ वागणूक देतो व कुठल्याही शैक्षणिक व अशैक्षणिक तसेच शासकीय प्रस्तावावर सही करीत नाही व सहीच्या बदल्यात पैशांची मागणी करीत अपमानास्पद वागणूक देतो . ही अतिशय गंभीर बाब असुन आम्हाला योग्य तो न्याय द्यावा तसेच आतापर्यंत झालेल्या दलित वस्ती सुधार अंतर्गत झालेल्या कामांची चौकशी करण्यात यावी असी मागणी गटविकास अधिकारी पंचायत समिती सिल्लोड यांच्याकडे तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें