सेलू प्रतिनिधी
सेलू. येथील न्यू हायस्कूल मध्ये शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाळेत स्वयंशासन दिन घेण्यात आला.
डाँ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरूवात झाली. शाळेतील शिक्षकांना शुभेच्छा देण्यासाठी हेम-गीता महिला मंडळाच्या वतिने सौ मोहिनी चिटणीस व सौ वर्षा जोशी यांनी सन्मान चिन्ह व बुके मुख्याध्यापक बी. एम. पगार यांना दिला. तसेच सुनिल गायकवाड मित्रमिंडळाच्या वतिने शिक्षकांना पुष्पगूच्छ देऊन गौरविण्यात आले.या प्रसंगी किरण जोशी, सुनिल गायकवाड, रामकृष्ण शेरे, गणेश चव्हाण,रवि गुंजकर, विश्वास शेरे, आकाश जाधव, विनोद शेरे,पर्यवेक्षिका नीता काळम आदिंची उपस्थिती होती. रोहिनी गीरी व संदिप डोळझाके या विद्यार्थ्यांनी आपले मत मांडले. वर्षा डिग्रसकर यांनी 'हीच आमची प्रार्थना आणी हीच आमची मागणी'हे गीत गाऊन वातावरण निर्मिती केली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन धनंजय भागवत यांनी केले.आभार संतोष कूलकर्णी यांनी मानले.
स्वयंमशासन दिन कार्यक्रमात दहावी व बारावीच्या एकून 45 विद्यारथ्यांनी भाग घेऊन मुख्याध्यापक, पर्यवेक्षक,शिक्षक व सेवकांच्या भुमिका पार पाडत शाळेचे व्यवस्थापन सांभाळले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें