शेतकऱ्यांना बाजाराचे व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य दिल्यासच आत्महत्या थांबतील-गजानन देशमुख. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 6 सितंबर 2018

शेतकऱ्यांना बाजाराचे व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य दिल्यासच आत्महत्या थांबतील-गजानन देशमुख.





सोनपेठ (राजेश खेडकर) दि.०६सप्टेंबर २०१८

देशातील शेतकऱ्यांना सुखाने व समाधानाने जगता यावे यासाठी शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व बाजाराचे स्वातंत्र्य असावे, असे मत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी शरद जोशी विचार यात्रेच्या दरम्यान व्यक्त केले. शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या संघर्ष यात्रेदरम्यान ते बोलत होते.
शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या जयंती निमित्त शरद जोशी यांचे विचार तरुण शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी परभणी जिल्हाभर शेतकरी संघर्ष यात्रेच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या विचार यात्रेच्या निमित्ताने सोनपेठ तालुक्यातील थडी उक्कडगाल, थडी पिंपळगाव, वाडी पिंपळगाव येथे पोहोचली आहे. या वेळी बोलतांना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी शरद जोशी यांचा शेतकरी स्वातंत्र्याचा विचारच देशाला तारु शकतो. शेतकऱ्यांना बाजाराचे व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य दिल्यासच शेतकरी आत्महत्या थांबतील असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमास शेतकरी संघटनेचे माधव जाधव, सोमनाथ नागुरे, हनुमान आमले, कलीम पटेल, नंदकुमार, विनायकराव देशमुख, अकबर पठाण, यांच्यासह सिध्देश्वर जाधव, शिवाजी जाधव, अशोक वारकरे, वसंत तेलभरे, सुर्यकांत कदम, अशोकराव चांदवडे, मोकिंद चांदवडे, चंद्रकांत भंडारे, किसनराव नायगावकर व आदी गावतील तरुण शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें