नगरपरिषदेचा दुर्लक्ष ; साफसफाई करण्याची होत आहे मागणी !
भोकरदन प्रतिनिधी (शेख सलिम) : शहरातील रिकाम टेकडी येथील अलहुदा उर्दू शाळे जवळील मुस्लिम बांधवांच्या कब्रस्तान मध्ये गाजर गवताने अक्षरशः विळखा घातला असुन याठिकाणी झाडे झुडपे देखील वाढल्याने मुस्लिम बांधवांना दफनविधी करण्यासाठी साठी मोठी अडचण निर्माण झाली असुन याकडे प्रकरणाकडे नगराध्यक्षा सह नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील मुस्लिम बांधव करित आहे , याठिकाणी गाजर गवताची व इतर झाडे झुडपाची साफसफाई करा अशी मागणी मुस्लिम बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे,
दरम्यान सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कब्रस्तान मध्ये गाजर गवत तसेच वेगवेगळे झाडे झुडपे वाढल्याने मुस्लिम समाजातील एखादया व्यक्तीचे निधन झाल्यानंतर कब्र खोदण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते अशा वेळी समाजातील एक गरीब कुटुंबातील व्यक्ती जो दुसऱ्या कडे कामाला दोन. तीन शे रुपयाने काम करतो असा व्यक्ती ज्याने स्वत दोन्ही कब्रस्तान मधील दोन ते तीन दिवसांपासून गाजरं गवत व झुडपे काढत आहे पण भोकरदन नगरपालिका याकडे लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे, या कब्रस्तानची गाजर गवत व इतर झाडे झुडपे काढून साफसफाई करण्यात यावी अशी मागणी येथील मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात येत आहे ,
हा काम फक्त निवडणुकी पुरता मर्यादित असतो असा प्रश्न मुस्लिम समाजातील नागरिकांत चर्चा सुरू आहे मुस्लिम समाजातील सहा नगरसेवक असुन ही मुस्लिम समाजातील कब्रस्तानची अशी ही दुर अवस्था नगरसेवक याकडे लक्ष देणार की येणाऱ्या लोकसभा विधानसभा साठी समाजात मतं मागायला येणार अशी चर्चा मुस्लीम करीत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें