आदर्श इंग्लिश स्कुलमध्ये " मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन" उत्साहात साजरा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 17 सितंबर 2018

आदर्श इंग्लिश स्कुलमध्ये " मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन" उत्साहात साजरा.



शेख सलिम.
भोकरदन प्रतिनिधी : भोकरदन येथील आदर्श इंग्लिश स्कुलमध्ये " मराठवाडा मुक्ती संग्राम दिन" उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष श्री. डाॅ. सुभाषरावजी सावंत, सचिव डाॅ. सौ. सुनिता सावंत, श्री शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल कळसाईत सर, मुख्याध्यापक राना. दौडसर यांच्या हस्ते पंडीत जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ध्वजारोहन डाॅ. सुभाषराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. तदनंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांची भाषणे झाली. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना भाषणामधून मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढ्या विषयी माहिती सांगीतली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पवार,शेटे, इंगळे,औटी, पिसे, सुरडकर मॅडम, रेखा इंगळे यांनी परीश्रम घेतले. गोळ्या , बिस्कीटांचे वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें