ग्रंथालय कृती समितीच्या तालुकाध्यक्षपदी धनंजय भिसेगांवकर. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 17 सितंबर 2018

ग्रंथालय कृती समितीच्या तालुकाध्यक्षपदी धनंजय भिसेगांवकर.



सोनपेठ (राजेश खेडकर) दि.१७सप्टेंबर २०१८

महाराष्ट्र राज्य ग्रंथालय कृती समितीच्या सोनपेठ तालुकाध्यक्षपदी धनंजय भिसेगांवकर यांची नुकतीच निवड करण्यात आली असुन सोनपेठ येथील कृतीसमीच्या बैठकीत त्यांना नियुक्तीपत्र आज देण्यात आले.
सार्वजनिक ग्रंथालयांच्या विविध मागण्या संदर्भात संघटनेच्या वतीने दि.१९ सप्टेंबर रोजी संपुर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याच्या संदर्भात सोनपेठ येथील मुक्तेश्वर सार्वजनिक वाचनालयात रविवारी ग्रंथालय कृती समितीच्या वतीने अढावा बैठक घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय कृती समितीचे परभणी जिल्हाध्यक्ष ए.बी.शिंदे यांच्याकडुन प्राप्त नियुक्ती पत्र, समितीचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गर्जे यांचे हस्ते धनंजय भिसेगांवकर यांना देण्यात आले. याप्रसंगी  बबन कुरे, हनुमान कुरे, रमेश मुलगीर, दिलीप मोकाशे, साहेबराव मोहिते, संजय ईंदुरकर, महादेव जाधव, तुकाराम कदम, रामेश्वर नरवाडे, भागवत जाधव आदींची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें