प्रल्हादपूर शाळेत दिव्यांग विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 17 सितंबर 2018

प्रल्हादपूर शाळेत दिव्यांग विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण.



भोकरदन तालुक्यातील प्रल्हादपूर येथील जिल्हा परिषद शाळेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ध्वजारोहणाचा मान शाळेतील इयत्ता 3 रीचा  दिव्यांग विद्यार्थी गणेश दादाराव धसाळ याला देण्यात आला.

आर. टी. ई. कायद्याने दिव्यांग विद्यार्थ्यांना सामान्य मुलांसोबत शिक्षणाचा हक्क दिलेला आहे. त्यामुळे अनेक शाळांतून दिव्यांग विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेतांना दिसतात. भारतातील अरूणिमा सिन्हा, रविंद्र जैन, सुधा चंद्रन इत्यादी दिव्यांग व्यक्तींनी वेगवेगळ्या क्षेत्रात अतुलनिय कामगिरी केलेली आहे. हे लक्षात घेऊन प्रल्हादपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमीत्त दिव्यांग विद्यार्थी गणेश दादाराव धसाळ याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यामुळे समाजाचा दिव्यांगांकडे पाहण्याचा द्रूष्टीकोण सकारात्मक झालेला दिसून येते.
तालुक्यात प्रल्हादपूर शाळा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते. काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्य दिनानिमीत्त शहिद जवानाच्या पत्नीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक कुंजीराम गोंधळे यांनी मार्गदर्शन केले. से.नि. मु.अ. केशवराव खेकाळे यांनी मुक्तीसंग्राम दिनाचा इतिहास सांगितला आणि अप्पासाहेब जाधव यांनी सद्यपरीस्थितीवर भाष्य केले. या वेळी उपाध्यक्ष जगन नामदे, पो.पा. रामधन नामदे, मा. सरपंच राजेंद्र नामदे, पत्रकार विश्वास धसाळ, गणेश नामदे, यशोदाबाई नामदे, मंगल दौड, वंदना वर्पे आदींची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें