शिक्षक दिनी परभणी शिक्षक मागणार भीक. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 4 सितंबर 2018

शिक्षक दिनी परभणी शिक्षक मागणार भीक.

           
प्रतिनिधी.
 महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक/क म वि शाळा कृती समिती ,परभणी च्या वतीने  परभणी येथे भीक मागो आंदोलन करण्यात येणार आहे 2014-15 या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये उच्च माध्यमिक शाळा /कनिष्ठ महाविद्यालय चे मूल्यांकन झाले तपासणीच्या नावाखाली शासन आणि प्रशासन यांनी 1500 प्रस्तावा पैकी फक्त 146 घोषित केले 28/02/2018 रोजी आणि बाकी उच्च माध्यमिक शाळा किरकोळ त्रुटी देऊन वेळकाढू पणा चालू आहे 04 वर्षांपासून ही प्रक्रिया अविरत पणे चालू आहे यामुळे आज आमच्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे ,आम्हाला वेठबिगारी सारखे राबविले जात आहे काही शिक्षकांनी आत्महत्या तर काहींची ह्रदय विकाराने जीवन  संपविले आहे सरकार आणखी किती जीवन उध्वस्त करणार आहे असा कृती समिती च्या वतीने प्रश्न विचारण्यात येत आहे .भीक मागो आंदोलन पुढील मागण्यांसाठी करण्यात येणार आहे पूर्वी घोषित केलेल्या आणि आयुक्त (शिक्षण)यांच्या पातळीवर पात्र घोषित करणे तसेच उर्वरित उच्च माध्यमिक च्या पात्र याद्या घोषित करून १००% पगार उच्च माध्यमिक शिक्षकांना द्यावा या मागण्यासाठी पूर्ण औरंगाबाद विभागामध्ये प्रा.मनोज पाटील आणि प्रा.दीपक कुलकर्णी  यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व शिक्षक यांनी सहभागी व्हावे असे आव्हान जिल्हाध्यक्ष प्रा.संगपाल सोनोने , सिराज सर (अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष)संजय देवकर ,नंदकुमार उबाळे ,बालाजी जाधव ,राजभोज सर ,तोंडारे सर आणि सम्पूर्ण जिल्हा कृती समितीच्या वतीने करण्यात आले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें