विवेकानंद विद्यालयात बाळ गोपाळांनी लुटला दहीहंडीचा आनंद . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 4 सितंबर 2018

विवेकानंद विद्यालयात बाळ गोपाळांनी लुटला दहीहंडीचा आनंद .



सेलू / प्रतिनिधी


 सेलू येथील विवेकानंद विद्यालयात कृष्णजन्माष्टमी निमित्ताने दहीहंडी व राधा -कृष्ण वेशभूषा हा कार्यक्रम दि.३सप्टेंबर (सोमवार ) रोजी घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मु.अ. बळवंत देशमुख होते.विनोद मंडलिक यांनी  कृष्णजन्माष्टमीचे अध्यात्मिक व सामाजिक महत्व विशद केले.राधा- कृष्ण वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. परीक्षक म्हणुन सौ मनीषा धर्माधिकारी उपस्थित होत्या.विध्यार्थ्यांनी विविध गवळणी , गीते सादर केली.सूत्रसंचालन सौ रागिणी जकाते यांनी केले.दीपाली पवार यांनी गवळण व विजय चौधरी यांनी श्रीकृष्ण गीत सादर केले. दहीहंडीनंतर प्रसाद म्हणून गोपाळकाला देण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी काशिनाथ पांचाळ ,नेत्रा ढाले , चक्रधर वाघमारे , चंदू कव्हळे , सेवक दत्ता गिरी यांनी प्रयत्न केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें