अखेर ती धोकादायक इमारत भुईसपाट. श्रीराम प्रतिष्ठानच्या ताब्यातील बाजार समितीची शेतकरी भवनाची जिर्ण इमारत. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 4 सितंबर 2018

अखेर ती धोकादायक इमारत भुईसपाट. श्रीराम प्रतिष्ठानच्या ताब्यातील बाजार समितीची शेतकरी भवनाची जिर्ण इमारत.


◆मा. न्यायालयाने उठविली स्थगीती. 


सेलु(प्रतिनिधि) :शहरातील बाजार समिती यार्डातील बाजार समितीच्या मालकीची मात्र श्रीराम प्रतिष्ठानच्या ताब्यात आसलेली धोकादायक जिर्ण इमारत न्यायालयाच्या निर्णयानंतर पाडण्यात आली.14 आँगस्ट रोजी सदरिल इमारत पाडण्याची प्रक्रिया सुरु असतांना मा. दिवाणी न्यायालय यांनी इमारत पाडण्यास तात्पुरती स्थगीती दिली होती. मंगळवार 4 रोजी न्यायालयाने दिलेली स्थगीती उठविल्यानंतर मार्केट यार्डातील ती धोकादायक शेतकरी भवनाची इमारत दुपारी 2:30 वाजता पाडण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. कापुस यार्डात बाजार समितीच्या मालकीची शेतकरी भवनाची इमारत प्रिन्स इंग्लिश स्कुलला सन 2001 पासुन भाडे तत्वावर दिलेली आहे. ही इमारत जुनाट असुन ती मोड़कळीस अाली असल्याने  तेथील इमारतीमध्ये सुरु असलेल्या शाऴेतील विद्यार्थ्यांच्या जिवितास धोका होण्याचा धोका होण्याचे कारण देवुन बाजार समितीने इमारत पाडण्यासाठी प्रक्रिया सुरु केली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी ही इमारत धोकादायक अवस्थेत तसेच दुरुस्तीस योग्य नसल्याचे पत्राद्वारे नमुद केले होते. त्यानंतर बाजार समीतीने मंगळवार दुपारी 2:30  वाजेच्या सुमारास जेसिबी यंत्र व पोलिस बंदोबस्तात इमारत पाडण्याची प्रक्रिया सुरु करुन ती जिर्ण इमारत भुईसपाट केली. इमारत पाडण्यासाठी बाजार समितीचे पदाधिकारी व संचालक ठाण मांडुन होते.यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
◆तहसीलदारांची मध्यस्थीची भुमिका फसली.
बाजार समितीने सदरिल इमारत धोकादायक व जिर्ण असल्याने श्रीराम प्रतिष्ठानच्या पदाधिका-यांना पत्राद्वारे वेळोवेळी कळवले होते. त्यानंतर 14 आँगस्ट रोजी ही इमारत पाडण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती मात्र श्रीराम प्रतिष्ठानच्या अध्यक्षांनी सेलु दिवाणी न्यायालयात स्थगीतीची याचिका दाखल करुन तात्पुरती स्थगीती मिळविली होती. त्यानंतर 28 आँगस्ट रोजी या याचीकेवर सुनावणी झाली व 3 सप्टेंबर रोजी मा. न्यायालयाने दिलेली तात्पुरती स्थगीती उठवुन बाजार समितीस रान मोकळे करुन दिले. असे असतांना मात्र तहसीलदार यांनी इमारत पाडतांना मध्यस्थी करण्याची भुमिका घेतली मात्र बाजार समिती इमारत पाडण्यासाठी काहीही ऐकण्यास तयार  नसल्याने अखेर ती धोकादायक इमारत पाडली व तहसीलदार यांनी केलेली मध्यस्थी फसली .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें