प्रतिनिधी कु.किरण जाधव शिर्डी .
जेव्हा जेव्हा देशावर संकटे आली तेव्हा तेव्हा आदिवासी जन जाती लोकांनी जल,जमिन ,आणि जंगल याचे सौरक्षण केले भारतामध्ये आदिवासी जन जाती समाज मोठ्या प्रमाणात विखुरला आहे आमच्यात कुठलाच भेदभाव नाही आम्ही सर्व भारत मातेचे लकरे आहोत जेव्हा जेव्हा देशावर संकटे आली या वेळी आदिवासी समाजातीलअनेक थोर विरसा मुंडा यांच्या सारख्या आदिवासी देशभक्ती तरुणाने आपली प्राणाची आहुती दिली महाराष्ट्र राज्यात आदिवासी समाज्यात ज्यांना जागा नाही त्यांना जागा देण्याचा प्रयत्न सुरु आहे पारतंत्राच्या काळात लोकं शिकुनये म्हणुन इंग्रजांनी शिक्षण पद्धती बंद केली होती वनवासी कल्याण आश्रम यांच्या मार्फत शिक्षणाची संधी उपलब्ध करण्यात आली होती आदिवासी समाज्यात २०ते२५ वय असतानाच जल,जमिन, जंगल याचे सौरक्षण करण्यास अनेक तरुणांनी आपले बलीदान दिले शिर्डीच्या पावन नगरीत आदिवासी संमेलन भरविल्यामुळे सर्व आदिवासी समाज एकत्र आला आहे महाराष्ट्र राज्य शासनातर्फे आदिवासी समाज्याचे अनेक प्रश्न सोडवुन शिक्षणाच्या प्रवाहात आणार आहे याच आदिवासी समाजाकडुन भारताला गोल्ड मेडल मिळुन देणारे आदिवासी बांधव आहेत यात वनवासी कल्याण आश्रम यांचा मोठा वाटा आहे असे ते शेवटी म्हणाले
साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे आपल्या भाषणात म्हणाले की साईबाबा संस्थानच्या माध्यमातून लोकांना रोजगार उपलब्ध होवा यासाठी अगरबत्तीचा उद्योग सुरु केला आहे साई शताब्दी वर्षा निमित्त परीसरात विकास कामांना गती मिळत आहे साईभक्तांना सुल्भ दर्शन होण्यासाठी प्रयत्न सुरु आहे मध्यंतरी काळात गंगागीरी महाराज यांचा सप्ताहाचा कार्यक्रम आयोजीत केला होता,याच प्रमाणे राज्यभराती शेतकऱ्यांसाठी मोफत शेतीविषयेक कार्य शाळेचे आयोजन केले होते याच प्रकारे विविध सांस्कृतीक,धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक कार्यास साईबाबा संस्थान नेहमीच प्रयत्नशील आहे या वेळी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, आमदार स्नेहलता कोल्हे, रामगीरी महाराज यांच्यासह ४२प्रांतातील आदिवासी जन जाती समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें