सिल्लोड नगरपरिषदेच्या वतीने २३७ दिव्यांग लाभार्थ्यांना धनादेश वाटप ; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 1 सितंबर 2018

सिल्लोड नगरपरिषदेच्या वतीने २३७ दिव्यांग लाभार्थ्यांना धनादेश वाटप ;


अपंगांना घरकुलाचाही लाभ मिळवून देणार - आ. अब्दुल सत्तार;

शेख कलीम
सिल्लोड : प्रतिनिधी (दि.०१) -
सिल्लोड नगरपरिषद अंतर्गत शहरातील दिव्यांग व्यक्तींना तीन टक्के निधी वाटप करुन देण्यात येत असल्याने त्यांना देण्यात येत असलेली आर्थिक मदत खूप मोठी नसली तरीही त्यातून मिळणारे समाधान लाख मोलाचे आहे. अपंग व दिव्यांगाना केली जाणारी आर्थिक मदत व पाठीवरुन मायेचा हाथ त्यातून त्यांना एक प्रकारची शक्ती मिळते आपल्या कडून सत्कार्य झाल्याचे समाधान प्राप्त होऊन सामाजिक कार्याची ऊर्जा व समाधान मिळते असे मत व्यक्त करीत अपंगांना घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ग्वाही माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी या प्रसंगी दिली आहे.

पुढे बोलतांना आ.अब्दुल सत्तार यांनी पुढील वर्षी दिव्यांग व्यक्तींना पाच टक्के निधी वाटप करण्यात येईल, तसेच प्रशासनाने अपंगांना रोजगार उपलब्ध करुन देऊन पन्नास टक्के सबसिडी देण्यात यावी असी मागणी पुढील अधिवेशनात मांडणार असल्याचे सांगितले.
सिल्लोड येथील नगरपरिषद अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना तीन टक्के निधी वाटप करण्यात आला.माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामदास पाटील पालोदकर, नगराध्यक्ष अब्दुल समीर आदि मान्यवरांहस्ते शहरातील २३७ दिव्यांग व्यक्तींना (सहा लाख पन्नास हजार रुपये ) तीन टक्के निधी वाटप करण्यात आला. यावेळी आ. अब्दुल सत्तार बोलत होते.
अपंग संघटनेच्या वतीने आ.अब्दुल सत्तार , जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामदास पाटील पालोदकर, नगराध्यक्ष अब्दुल समीर यांचे अपंग संघटनेच्या वतीने संतोष कारले, शेख वसिम यांनी स्वागत केले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती नंदकिशोर सहारे , रमेश साळवे, दुर्गाबाई पवार ,उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड, शहराध्यक्ष प्रा.मन्सूर कादरी, जिल्हाउपाध्यक्ष शांतीलाल अग्रवाल, पंचायत समिती सदस्य निजाम पठाण, माजी उपनगराध्यक्ष  विठ्ठलराव सपकाळ, सलिम हुसैन, रुपेश जैस्वाल, नगरसेवक रऊफ बागवान, रईस मुजावर पठाण, शेख मोहसीन, मोहमद ईसाहक, राजेंद्र गौर, कैसर आझाद, सत्तार हुसैन, राजु दुधे, शेख बाबर बागवान,
कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सतिश ताठे, नरसिंगराव चव्हाण ,हनिफ मुल्तानी, राजुमिया देशमुख, सुखदेव जिवरग, मतीन देशमुख, अमित कळम,हाजी मोहम्मद हनिफ,संतोष कारले, मधुकरराव बेंडाळे, संजय मुरकुटे, मुश्ताक बापु देशमुख,गणेश डकले, कुणाल सहारे, अकिल देशमुख,लक्ष्मण कल्याणकर,अफजल बेग, राजेश्वर आरके ,अमित आरके, राजु साठे,मनोहर आरके,अब्दुल बासित, साहेबराव सिरसाठ,शेख वसिम, सुभाष जाधव, भावराव दुधे,अक्षय मगर, सखाराम अहिरे,रवि आरके, अमोल कुदळ, तौसिफ पठाण,धम्मपाल दांडगे,तुळशीराम डफळ,यांच्यासह काँग्रेस पक्ष पदाधिकारी - कार्यकर्ते नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरपरिषद मुख्याधिकारी अशोक कायंदे यांनी केले तर सूत्रसंचालन देवेंद्र सुर्यवंशी यांनी तर आभार नंदकिशोर सहारे यांनी व्यक्त केले.

अपंगांना घरकुलासाठी एक कोटी उपलब्ध;अनेक ग्रामपंचायती अपंगांना तीन टक्के निधी वाटप करीत नसल्याच्या तक्रारी येत असुन सदरील ग्रामपंचायतींवर कार्यवाही करण्यात येणार असुन यापूर्वी अपंगांना घरकुलांसाठी चाळीस लाख रुपये उपलब्ध करण्यात आले होते यावर्षी अपंगांना घरकुलासाठी एकंदरीत एक कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे यांनी सांगितले. 
नगरपरिषद आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी -- नगराध्यक्ष अब्दुल समीर;नगरपालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांच्या विविध अडी अडचणी सोडविण्याबरोबरच विविध विकास कामे हाती घेण्यात येत आहे. नगरपरिषदेच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना तीन टक्के निधी वाटप करण्यात येत असतांना आपल्या हातून गोरगरिबांच्या होत असलेलया सामाजिक सेवेविषयी समाधान व्यक्त करीत नगरपरिषद आपल्या पाठिमागे खंबीरपणे उभी असल्याचे मत नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी व्यक्त केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें