सोनपेठ(राजेश खेडकर) दि.०६सप्टेंबर २०१८
ज्या ध्येयापर्यंत पोहचायचे आहे, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बांबीचा अभ्यास केल्यानंतर यश हमखास प्राप्त होते. ध्येय गाठण्यासाठी अभ्यास ही गुरूकिल्ली असल्याचे प्रतिपादन सोनपेठचे नायब तहसीलदार डॉ. निकेतन वाळे यांनी केले. सोनपेठ येथील कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयात आयोजित करिअर अँड कौन्सिलिंग सेलच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वसंत सातपुते तर प्रमुख पाहूणे गणेश पाटील होते. मंचावर प्रा. डॉ. शिवाजी वडचकर उपस्थित होते.
यावेळी डॉ. निकेतन वाळे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाबद्दल मार्गदर्शन केले. गणेश पाटील यांनीही विद्यार्थ्यांनी अभ्यास करून ज्ञानावर अधारीत मोठे पद पटकावले पाहीजे असे म्हटले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांनी आत्मविश्वासापेक्षा कुठलेही शिखर मोठे नाही, ज्यावेळी अशा उच्च शिखरावर पोहचाल तेंव्हा ते तुमच्या पायाखाली असते. म्हणून आत्मविश्वासाने व कष्टाने ते पदाक्रांत करण्याचा प्रयत्न करावा असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सखाराम कदम, प्रास्ताविक प्रा. डॉ. संतोष रणखांब यांनी तर आभार प्रा. डॉ. अंबादास बर्वे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापकवृंंद व कर्मचारी बाबुराव फड, दत्ता सोनटक्के यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें