सोनपेठ(राजेश खेडकर) दि.२३सप्टेंबर २०१८
सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीच्यावतीने मागील कांही दिवसांपूर्वी
फेसबुकवर व व्हाट्सएप सारख्या समाज माध्यमातून
वाचन प्रेरणा दिनासाठी ग्रंथ वाचन चळवळीस ग्रंथ भेट देऊन मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार दि.२३सप्टेंबर रविवार रोजी कारगिल युद्धातील शहीद मुंजाभाऊ तेलभरे यांचे बंधू श्रीहरी तेलभरे यांनी मुद्दाम चाकण जि.पुणे येथून सोनपेठला येऊन वाचन प्रेरण दिनासाठी पुस्तके भेट दिली. यावेळी ग्रंथ वाचन चळवळीचे सदस्य सर्वश्री सुधीर बिंदू, मंजुर मुल्ला, राधेश्याम वर्मा, प्रा.डॉ.संतोष रणखांब, पत्रकार गणेश पाटील, कृष्णा पिंगळे, पर्यावरण संरक्षण व वृक्षारोपन आणि संरक्षण समितीचे जिल्हा सचिव माऊली आदत, दत्त मोरे, ग्रंथ वाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश खेडकर व ग्रंथदाते श्रीहरी तेलभरे आदी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें