कौसडी/प्रतिनिधी
देशात कुष्ठरोग निर्मूलनाची मोहीम सुरू आहे या रोगाचा एकही रूग्ण उपचारापासुन वंचित राहणार नाही या साठी कुष्टरोग मोहीम जिंतुर तालुक्यातील कौसडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा अंर्तगत आशा चे कर्मचारी आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातुन मोहीम राबवली जात आहे असे वैध्यकीय अधिकारी डाॅ.ए.ए.जाधव यांनी सांगीतले.या
कुष्टरोग शोध मोहीम दिनांक 24 सप्टेंबर ते 9 अक्टोंबर राबवण्यात येणार आहे त्याचे प्रशिक्षण 19 सप्टेंबर रोजी प्रथामीक आरोग्य केंद्राच्या मिटिंग हाॅल मध्ये आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाकडुन देण्यात आले असुन या कुष्टरोग मोहीमेत आशा कर्मचारी व आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन या रूग्णांनची तपासणी करणार आहे अशी माहीती डाॅ.जाधव यांनी दिली या कुष्टरोग मोहीमेचा प्रशिक्षण आशा कर्मचारी व आरोग्य कर्मचारी यांना डाॅ.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले या वेळी कुष्टरोग तंत्रज्ञ श्री घुगे आशा चे तालुका सुपरवायजर श्रीमती मिरा देशमुख गटप्रवर्तक श्रीमती वजीर आशा कर्मचारी व आरोग्य कर्मचारी तसेच स्वंयसेवक हे उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें