आधार कार्डवैध असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे.आधार कार्डमुळे गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन होत असल्याचा दावा करणाऱ्या याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. यावर गेल्या चार महिन्यांपासून सुनावणी सुरू होती. आज सर्वोच्च न्यायालयानं याप्रकरणी निकाल दिला. आधार कार्ड वैधच असल्याचं न्यायालयानं म्हटलं. आधार कार्डमुळे देशातील सामान्य नागरिकाला वेगळी ओळख मिळाल्याचं न्यायालयानं निकालाच्या वाचनात म्हटलं आहे.
केंद्र सरकारनं कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य केलं होतं. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाच 27 याचिका दाखल झाल्या होत्या. आधार कार्डच्या सक्तीमुळे घटनेनं नागरिकांना दिलेल्या गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन होत असल्याचा आक्षेप नोंदवण्यात आला होता. यावर आज सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला. पॅन लिंक करण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. मात्र सीम कार्ड खरेदी करण्यासाठी आधार गरजेचं नाही, खासगी कंपन्यांना आधारची सक्ती करता येणार नाही, असा निकाल न्यायालयानं दिला. याशिवाय शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आधार कार्ड गरजेचं नसल्याचं न्यायालयानं म्हटलं.
आधार कार्डच्या वैधतेवर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने मोबाईल नंबर, बँक खाते, शाळेतील प्रवेश तसेच बोर्डाच्या परीक्षेतील आधार सक्तीबाबतही महत्त्वपूर्ण मत मांडले. सीबीएसई विद्यार्थ्यांना दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी आधारची सक्ती करु शकत नाही. तसेच शाळेत प्रवेश घेतानाही आधार सक्ती करता येणार नाही. याशिवाय बँक खाते, मोबाईल क्रमांक आधारशी जोडणे बंधनकारक नसल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें