सिल्लोड (प्रतिनिधी)दि 27/09/2018.
जनतेला ' अच्छे दिनाचे ' गाजर दाखवून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने एकही आश्वासन पुर्ण केले नाही,उलट सर्वसामान्यांचे जगणे अवघड केले आहे. या ढोंगी सरकारला त्यांच्या आश्वासनांची जाणीव करून देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने एल्गार याञा काढण्यात आली असल्याचे मत माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
सिल्लोड तालुक्यातील भराडी - घाटनांद्रा येथे एल्गार याञेत हजारोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना आ.अब्दुल सत्तार बोलत होते.
पुढे बोलतांना आ. अब्दुल सत्तार म्हणाले, सरकारने केलेल्या नोटाबंदीमुळे कुणालाच लाभ झाला नाही उलट जनतेला बँका आणि एटीएम समोर ताटकाळत उभे राहावे लागले. पेट्रोल - डिझेल दरवाढीचा सर्वसामान्य जनतेस आर्थिक फटका बसत आहे. फसवी कर्जमाफी जाहीर करुन शेतक-यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात सरकार अपयशी ठरले आहे. आश्वासनांची पुर्तता न करणा-या या ढोंगी सरकारला जाग आणण्यासाठीच एल्गार याञा काढण्यात आली असुन जनतेने जागृत होऊन सरकारला जाब विचारण्याची वेळ आली असल्याचे मत माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे,तालुकाअध्यक्ष देविदास पाटील लोखंडे,श्रीराम पाटील महाजन,नगराध्यक्ष अब्दुल समीर, रमेश पाटील साळवे, पुंडलिकराव मोरे,कौतिकराव मोरे,नरसिंगराव चव्हाण, आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष विठ्ठलराव सपकाळ,राजुमिया देशमुख,सुनिल दुधे, सत्तार हुसैन,मनोज झंवर,मनोज जैस्वाल, अमित आरके,नामदेव पांढरे, देविदास आमटे,गजानन महाजन,राजु गौर,शेख बाबर, रविंद्र राजपूत,दत्ता जोशी,अनिस पठाण,संजय मुरकुटे,अकिल देशमुख, आसेफमिया देशमुख,राम सरोदे,मुजीब मुल्ला,नामदेव सुस्ते,रमेश पारखे,हरिरंग सुस्ते,विजय जाधव,संजय बन्सोड,रघुनाथ मोरे,नामदेव कदम,हरिदास दिवटे,अक्रम देशमुख,रफिकमिया देशमुख,कचरु मोरे,मोहसिन पठाण,अशोक गुळवे,रामकृष्ण मोरे,सुरेश अंभोरे,जगन्नाथ कुदळ, फईम पठाण,आदिंची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें